कोकणातील प्रसिद्ध श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा १८ फेब्रुवारी रोजी यात्रोत्सव

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकणात प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान चिपळूण तालुक्यातील शिरगाव, कुंभार्ली,पोफळी या तीन गावच्या श्री.सुखाई वरदायिनी महाकाली या जागृत देवस्थानची यात्रा बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी कुंभार्ली येथे संपन्न होत आहे. यावेळी धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान तर्फे देण्यात आली आहे. या देवींचा वार्षिक भव्य यात्रोत्सव म्हणजे तीन गावांसाठी आनंदाची पर्वणीच असते. तिन्ही गावे स्थानिकांसह चाकरमन्यांनी फुलून जातात. तर या यात्रोत्सवानिमित्त मंदिर विद्युत रोषणाई फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात येते. शिरगाव,कुंभार्ली, पोफळी ही तीन गावे एका कुटुंबाप्रमाणे नांदत आहेत. या तीन गावच्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रा उत्सव बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी कुंभार्ली येथे संपन्न होत आहे. यामध्ये सकाळी ७ ते ९ वाजता देवीला अभिषेक व रुपी लावणे. सकाळी ९ ते १० देवींची पूजा व आरती, सकाळी १० ते ११ लाट चढवणे, सकाळी १२ ते २ अन्नप्रसाद, सकाळी ११ ते २ श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल शिरगाव, समर्थ रक्तपेढी डेरवण आणि महाकाली देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दुपारी ३ ते ४ मांड भरणे, लाट प्रदक्षिणा, सायंकाळी ४ ते वाजता पारंपारिक ढोल वाद्य, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, सायंकाळी ६ वाजता कबड्डीचा अंतिम सामना व बक्षीस समारंभ, सायंकाळी ७ ते रात्री वाजता ८ मयूर उबाळे प्रस्तुत जय जगदंबा संबळ पथक, रात्री १० नंतर वसंतराव वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल. देवींच्या वार्षिक भव्य यात्रोत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांकरता चिपळूण डेपोतून खास यात्रेसाठी एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे.


