Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

मंगळागौरच्या उत्सवातून चिपळुणात स्त्रीशक्तीचा जागर!भाजपच्या चिपळूण शहर व ग्रामीण महिलांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद

मराठी सिने अभिनेत्री आरती शिंदे यांची उपस्थिती ठरली प्रमुख आकर्षण

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनता पार्टी, चिपळूण शहर व ग्रामीण महिलांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मंगळागौर सादरीकरण आणि कष्टकरी महिला सन्मान सोहळ्या’ला चिपळूणकर महिलांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘परंपरेचा उत्सव… स्त्रीशक्तीचा जागर!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडतानाच कष्टकरी महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री आरती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.

भारतीय जनता पार्टी, चिपळूणच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मंगळागौरच्या पारंपरिक खेळांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना आणि सामूहिक सहभागाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच, आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून आणि भारतमाता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा मंजुषा कुद्रीमोदी, अभिनेत्री आरती शिंदे, भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ महिलांचाही यावेळी सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

भाजपच्या उपनगराध्यक्षा सौ. रुपाली दांडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मंगळागौरच्या परंपरेमागील सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर गणेशवंदनेने वातावरण भक्तिमय झाले आणि मंगळागौरीच्या पारंपरिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यावेळी महिला ग्रुपच्या वतीने महिला शेतकरी सन्मान योजना तसेच विविध शासकीय योजनांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती मनोरंजक आणि प्रभावी पद्धतीने मांडण्यात आल्याने हे सादरीकरण उपस्थित महिलांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले.

मंगळागौरच्या पारंपरिक खेळ, उत्साहपूर्ण सादरीकरण आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा परिसर अक्षरशः उत्साहाने भारून गेला. परंपरेला आधुनिक सामाजिक जाणिवेची जोड देत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव, कष्टकरी महिलांप्रती कृतज्ञता आणि स्त्रीशक्तीचा जागर या त्रिसूत्रीचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली मंगळागौरीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच महिलांच्या सामर्थ्याला, कर्तृत्वाला आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देणारा हा सोहळा चिपळूणच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारा ठरला. कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा चिपळूणच्या महिलांच्या वाढत्या सामाजिक सहभागाचे आणि स्त्रीशक्तीच्या जागृतीचे प्रभावी प्रतीक ठरला.
या कार्यक्रमाला
जिल्हाध्यक्ष सतीश मोरे,चिपळूण नागरीच्या संचालिका
स्मिता चव्हाण,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे,
जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर,
जिल्हा चिटणीस ऍड.नयना पवार, जिल्हा विशेष निमंत्रीत स्वप्ना यादव, तालुका ग्रामीण महिला अध्यक्ष आदिती गुढेकर,
शहर अध्यक्षा महिला मोर्चा रसिका देवळेकर,
महाराष्ट्र प्रदेश सचिव ऐश्वर्या जठार, रत्नागिरी मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष सुचिता नाचणकर,
रत्नागिरी मध्य महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी,
रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चा अध्यक्ष अनघा साळवी, रत्नागिरी उत्तर मंडल महिला तालुकाध्यक्ष ध्रुवी लाकडे, शहर मंडल शहर चिटणीस सारिका भावे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,नगरसेविका शीतल रानडे,वैशाली निमकर, अंजली कदम,रुही खेडेकर, स्वाती देवळेकर,संगिता पालकर, संजीवनी शिगवण, वीणा जावकर,तेजस्विनी किंजळकर,सपना भिसे, मृणाल घटे,विया नलवडे,रेश्मा पवार, प्रियाताई भुवड, माधुरी शिंदे, माधवी शिंदे, शिल्पा शिंदे, विद्या शेट्ये,रसिका आयरे, प्रिया वाजे, मानसी खेतले, शितल कदम, संध्या पाटील, नेहा दाते, मृण्मयी दाते,तृप्ती यादव
ग्रामीण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी,
रत्नागिरी शहर अध्यक्ष दादा ढेकणे,
नगरसेवक संदीप भिसे, बँकिंग सेल जिल्हा संयोजक दीपा देवळेकर, विलास चव्हाण, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, रावी मोरे, पंचायत समिती सदस्य सायली वाजे,
आरती सकपाळ,नीलम जाधव, नगरसेवक राणी महाडीक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!