Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यविषयक आढावा बैठक संपन्न

नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांसह प्रलंबित कामांचा घेण्यात आला आढावा

चिपळूण (ओंकार रेळेकर): रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक २७ ऑगस्ट रोजी आरोग्यविषयक समितीची सभा उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सुविधांचा तसेच केंद्रातील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी आरोग्य केंद्रातील प्रलंबित कामे, नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, नागरिकांच्या समस्या, उपकेंद्रांमधील कामकाज, औषधांचा उपलब्ध साठा, लसीकरण आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.जि.प सदस्य प्रमोद निवळकर यांनी देखील अभ्यासपूर्ण शैलीत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांच्या समस्या मांडून त्यावर उपाय योजना करण्यास सुचवले.
तसेच नागरिकांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या चर्चा झाली तसेच आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीनेही बैठकीत आढावा घेण्यात आला.आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये नागरिकांना वेळेवर आणि आवश्यक आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी संबंधितांनी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जन आरोग्य समिती अध्यक्ष जि.प सदस्य प्रमोद निवळकर,
पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर,सुप्रिया वंजारे,सुदेश गमरे, सौ.खैर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!