भाजप स्थापना दिनी विविध उपक्रमांसह स्वच्छतेचा जागर!
चिपळूण शहरात कार्यक्रमांचे नियोजन : शशिकांत मोदी

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल हा स्थापना दिन चिपळूण शहर मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दोन दिवस साजरा होणाऱ्या या कार्यक्रमात स्वच्छतेचाही जागर होणार असल्याची माहिती शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी दिली.
दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता चिपळूण नगर परिषदे समोर कडवेकर निवास येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी १०:१५ वाजता शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रवीण कांबळी नागरिकांना देणार आहेत. सकाळी १०:३० वाजता बूथ अध्यक्षांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून, सकाळी ११:३० वाजता पक्षाच्या लोखंडी वार्ताफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ४ वाजता परांजपे मोतीवाले हायस्कूल येथे नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून, कार्यकर्ते व सदस्यांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
स्थापना दिनानिमित्त पुढील उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. ७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता रामतीर्थ स्मशानभूमी, रामतीर्थ गार्डन व रामतीर्थ तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता करण्यात येणार आहे.या कार्यक्रमांना जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, तसेच जिल्हा संयोजक राजुजी भाटलेकर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे संयोजन रसिका देवळेकर, शुभम पिसे, विलास चव्हाण, वैशाली निमकर, संदीप भिसे व दिनेश लटके यांनी केले असून, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. मोदी यांनी केले आहे.




