महाराष्ट्र

शिरवलीत नवीन अंगणवाडी इमारतीचे आज आ.भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन

चिपळूण तालुक्यातील शिरवली गावाच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण काम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण तालुक्यातील शिरवली येथे नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज २३ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ होणार आहे.

जिल्हा परिषद रत्नागिरीच्या बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या या कामामुळे शिरवली गावातील बालकांना अधिक चांगल्या शैक्षणिक व पूरक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.
अंगणवाडी ही केवळ बालकांना शिक्षणाची प्राथमिक ओळख करून देणारी जागा नसून, बालकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया घडविणारे महत्त्वाचे केंद्र आहे. लहान वयातच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, तसेच पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी अंगणवाडीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे शिरवली येथे नवीन अंगणवाडी इमारत उभारण्याच्या कामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.या सोहळ्याला माजी मंत्री.आमदार भास्कर जाधव ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जि.प सदस्य विक्रांत जाधव,शिवसेना ज्येष्ठ नेते संदीप चव्हाण,शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष जाधव ,जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर, पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर, पंचायत समिती सदस्य सौ.सुप्रिया वंजारे ,युवा नेते प्रीतम वंजारे,संदीप तटकरे, प्रवीण आंब्रे, रविंद्र माने,रमेश वेल्हाळे, विवेक धावडे, वैभव तांडेल, प्रकाश तटकरे,सुरेश तांडकर,
तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!