शिरवली येथे होणाऱ्या नव्या अंगणवाडी इमारतीमध्ये शिक्षण घेऊन चांगल्या संस्काराचे बालविद्यार्थी घडतील : आ.भास्कर जाधव
आ.भास्कर जाधव यांच्या हस्ते शिरवली गावात नव्या अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिरवली शाळेच्या प्रांगणात नव्या अंगणवाडी भूमिपूजन संपन्न झाले भविष्यात येथे होणाऱ्या सुसज्ज अंगणवाडी इमारतीमधून शिक्षण घेऊन चांगल्या संस्काराचे बालविद्यार्थी घडतील असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना नेते आ.भास्करराव जाधव यांनी केले.
चिपळूण तालुक्यातील शिरवली येथे निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत शिरवलीच्या वतीने अंगणवाडी इमारतीचा भूमिपूजन सोहळा काल उत्साहात संपन्न झाला.गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आ.जाधव बोलत होते.
या कार्यक्रमामुळे गावातील बालकांसाठी शैक्षणिक सुविधांच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.
अंगणवाडी इमारतीच्या उभारणीमुळे गावातील लहान मुलांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत शिरवलीच्या पदाधिकारी आणि जि.प प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.यावेळी आ.भास्कर जाधव, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष जाधव,चिपळूण प.स सदस्या संजीवनी खापरे,माजी सरपंच संदीप तटकरे,उपतालुका प्रमुख संदीप चव्हाण,प्रभाकर जाधव,रघुनाथ चाळके,सरपंच रिया गीमवकर,नम्रता मोहिते,चंद्रकांत ताणकर, संतोष गोंधळेकर,रमेश कुंभार,प्रकाश तटकरे,राजेंद्र लाड,दीपक धावडे, रवींद्र कदम,रमेश वेलोंडे,रवींद्र गमरे,सुरेश तांडकर,वैभव तांडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : शिरवली अंगणवाडी नव्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आ.भास्कर जाधव,सुभाष जाधव,संदीप तटकरे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी छायाचित्र दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




