महाराष्ट्र

रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या हस्ते अभिराज देसाई यांच्या ‘कनक आर्किटेक्ट्स’ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

वास्तुशिल्प क्षेत्रातील नव्या पर्वाचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

रत्नागिरी (ओंकार रेळेकर)दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी येथील अभिराज देसाई यांच्या कनक आर्किटेक्ट्स’ या वास्तुशिल्प संस्थेच्या नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यामुळे वास्तुशिल्प क्षेत्रातील नव्या वाटचालीला सुरुवात झाली असून, ग्राहकांना दर्जेदार वास्तुशिल्प सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
रत्नागिरी शहरात सुरू करण्यात आलेल्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी चिपळूणचे आर्किटेक्ट दिलीप देसाई, आर्किटेक्ट अभिराज देसाई, गणेश जोशी, रुपेश साळवी आणि राहुल पाणंगले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी कनक आर्किटेक्ट्सच्या नव्या उपक्रमाला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!