महाराष्ट्र

वेदिका जगदाळेची जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णभरारी!१०० मीटर धावणे आणि लांब उडीत सुवर्णपदक

हैदराबाद येथील राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड

साडवली (ओंकार रेळेकर) : पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल, साडवली येथील विद्यार्थिनी कु. वेदिका सुनील जगदाळे हिने जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत दोन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. १०० मीटर धावणे आणि लांब उडी या दोन्ही क्रीडाप्रकारांत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वेदिकाची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे साडवलीसह संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरी जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने १८ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स निवड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वेदिकाने आपल्या वेगवान धावण्याच्या कौशल्यासह लांब उडीतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दोन्ही प्रकारांत अव्वल स्थान पटकावले. दोन सुवर्णपदकांची कमाई करत तिने राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!