महाराष्ट्र

श्री सिंमेट, बांगर सिंमेटची ग्राहकांना उत्तम सेवा देणार

चिपळूण खेर्डी औद्योगिक वसाहतीतील गोडावूनच्या उद्घाटनाप्रसंगी कंपनीचे क्लस्टर हेड अवतारसिंग भोगल यांचे प्रतिपादन

चिपळूण (ओंकार रेळेकर)वितरक व ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीच येथे श्री सिंमेट व बांगर सिंमेटचे गोडावून सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या गोडावूनच्या माध्यमातून सर्वांना उत्तम सेवा देणार असल्याचे प्रतिपादन कंपनीचे क्लस्टर हेड अवतारसिंग भोगल यांनी केले.

श्री सिमेंटचे सेल्स प्रमोटर वसंत उदेग व बांगर सिमेंटचे सेल्स प्रमोटर सरफराज मालानी यांच्या मागणीनुसार अन्य वितरक व ग्राहकांच्या सेवेसाठी खेर्डी औद्योगिक वसाहतीत कंपनीने गोडावून सुरू केले आहे. या गोडावूनचे सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी भोगल बोलत होते.ते पुढे म्हणाले की ५५० किलोमीटरवरुन या दोन्ही सिंमेटची वाहतूक होते. त्यामुळे पुरवठा करताना काही अडचणी येत होत्या. त्यामुळे तुम्हा सर्वांना उत्तम व जलद सेवा मिळावी म्हणून वसंत उदेग, सरफराज मालानी हे येथे गोडावून व्हावे म्हणून आमच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यामुळे त्यांच्यामुळे आज हे गोडावून येथे होत असून यापुढे सर्वांना सिंमेटची घरपोच सेवा मिळणार आहे. उदेग व मालानी यांनी कंपनीच्या सिंमेटला खऱ्याअर्थाने उंचीवर नेले आहे. या गोडावूनमुळे ते आणखी उंचीवर नेतील असा विश्वास भोगल यांनी व्यक्त केला.यावेळी बोलताना श्री सिमेंटचे सेल्स प्रमोटर वसंत उदेग म्हणाले की, आजपर्यंत वितरक व ग्राहकांना आमच्याकडून त्यांच्या खर्चाने सिंमेट घेऊन जावे लागत होते. मात्र या गोडावूनमुळे आता सर्वांना घरपोच सेवा कंपनीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. याचा आर्थिक भार कंपनीवर पडणार आहे. तरीही ग्राहकांच्या सेवेसाठी आमच्या मागणीनुसार कंपनीने हे गोडावून सुरू केले आहे. मात्र सेवा दिली की यश मिळते. त्यामुळे कंपनीला आम्ही मोठे यश मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला. बांगर सिमेंटचे सेल्स प्रमोट सरफराज मालानी यांनी आम्ही सर्वांना चांगली सेवा देऊ यामुळे विस्तार वाढेल आणि याचा फायदा सर्वांसह कंपनीला होईल असे नमूद केले. याप्रसंनी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.यानिमित्ताने वितरक, बांधकाम व्यावसायिक आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कंपनीचे राज्याचे सेकंडरी लॉजिस्टीक हेड विवेक गर्ग, झोनल सेल्स एक्सेलेन्स हेड बशीर अन्सारी, सेकंडरी लॉजिस्टीक एमएचवन श्रीकांत पिंगळे, रिजनल सेल्स हेड सुमित चौधरी, युवा उद्योजक दयाळ उदेग,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे,हँडलिंग एजंट गोरख देशमुख, डिलर ज्ञानेश पाठक आदींसह हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचलन सखी थरवळ यांनी केले.

फोटो : खेर्डी औद्योगिक वसाहतीतील श्री सिंमेट, बांगर सिमेंटच्या गोडावूनचे फित कापून उद्घाटन करताना अवतारसिंग भोगल. सोबत विवेक गर्ग, बशीर अन्सारी, श्रीकांत पिंगळे, वसंत उदेग, सरफराज मालानी आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!