गायक अवधूत गुप्ते यांनी चिपळूण वासियांची मने जिंकली सुपरहिट गाण्यावर शेकडो प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

चिपळूण (ओंकार रेळेकर) महाराष्ट्राच्या सीनेसृष्टीतील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांनी वाशिष्टी कृषी महोत्सवात सादर केलेल्या नाविन्यपूर्ण गाण्यांवर चिपळूणचे शेकडो प्रेक्षक थिरकताना दिसले. चिपळूण दौऱ्यात ३० गाण्यांचा धमाकेदार परफॉर्मन्स शो उत्साही चाहते नाचू लागले नी डोलू लागले वाशिष्ठी प्रकल्पासह स्वामिनी निवासस्थानी भेट गुलाबी थंडीत दुमदुमली कुशी नगरी प्रचंड प्रतिसाद कृषी मोहोळची सांगता झाली
मराठी मनोरंजन विश्वातील एक बहुआयामी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व संगीतकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, मुलाखतकार टीव्ही शो परीक्षक आणि सर्वांचा लाडका गायक अवधूत गुप्ते त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स शो वाशिष्ठी कृषी महोत्सवात गुरुवारी रात्री सादर झाला आणि हजारो चाहते प्रेक्षक अक्षरशः घायाळ झाले प्रत्येक गाण्याला प्रचंड जल्लोष करीत हौशी नागरिक या धमाकेदार कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. तब्बल तीन तास हा शो उत्तरोत्तर रंगत गेला.
चिपळूण पालिकेच्या सावरकर मैदानावर सुरू असलेल्या कृषी महोत्सवाची नऊ जानेवारीला उदंड प्रतिसादात सांगता झाली चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी रात्री नऊ वाजता गायक अवधूत गुप्ते आपल्या सहकाऱ्यांसह भव्य मंचावर दाखल झाले आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून सर्व कलाकारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजक उद्योजक प्रशांत यादव व स्वप्ना यादव, सहकार महर्षी सुभाषराव चव्हाण सौ. स्मिताताई चव्हाण कु. स्वामिनी यादव यांनी अवधूत गुप्ते यांचा यथोचित सन्मान केल्यावर कार्यक्रमाला प्रारंभ झाला
गणेश वंदनाने सुरुवात
डोक्यावर फेटा अंगात जॅकेट अशा पारंपारिक वेशभूषेत चिपळूणकर यांना साथ घालून गुप्ते यांनी सुरुवात केली त्यांच्यासह विजय धुरी, ईशानी पाटणकर, अनुष्का यांनीही सहभाग घेतला आणि सोबत नर्तिकीनेही उत्तम प्रकारे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली.
सूर निरागस ने गणेश वंदन…
सूर निरागस हो या गाण्याने गणेश वंदन करून सुरू झालेला हा संगीत उत्सव प्रचंड रंगला वाजला आणि गाजला गणेश आराधनेनंतर ही गुलाबी हवा…. गणाधीशा… मेरी मधुबाला… सखे तुझ्या नावाचा… कांदे पोहे…. पत्रास कारण… झेंडा… मी मराठी… येऊ कशी प्रिया.. दाजीला मला जाऊ दे या हिट मराठी गाण्यांसह गहिरे समंदर की गहराहिया.. दिल क्या करे जब किसी से.. जाऊ डेटवर.. माझी आजी म्हणायची.. ऐका दाजीबा.. जाऊया बुलेटवर अशी हिंदी आणि रिमिक्स गाण्यावर प्रेक्षकांनी ताल धरला हळूहळू चाल.. उंदीर मामा.. राजा आला.. दीपाडी दीपांग.. लग्नाळू… जेवायला काय.. शिट्टी वाजली अशा गाजलेल्या गाण्यावर प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळाला. भीती ना आम्हा… जय जय महाराष्ट्र या अखेरच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या शोमुळे गुलाबी थंडीत अति कुशी नगरी दुमदुमून गेली. आजूबाजूला खच्चून गर्दी होती. तीन तास हजारो प्रेक्षक जागेवरून हलले नाहीत. टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष असेच उत्साही वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सुटसुटीत नियोजन पाहून गायक अवधूत गुप्ते यांनी यादव दांपत्यांचे कौतुक केले.
दुग्ध प्रकल्पाला सदिच्छा भेट
गायक अवधूत गुप्ते यांनी शुक्रवारी यादव कुटुंबीयांच्या खेरडे येथील स्वामिनी निवासस्थानी भेट देऊन साई मंदिराचे दर्शन घेतले त्यांच्यासोबत प्रसिद्ध अँकर अभिजीत गोडबोले हेही होते. निवासस्थानी यादव उभयंता आणि डॉ. स्वामिनी यादव यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर त्यांनी वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाची पाहणी केली. डेरीचे जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, मॅनेजर प्रदीप मगदूम आणि इतर अधिकाऱ्यांनी गुप्ते यांचे स्वागत केले तर प्रशांत यादव, स्वप्ना यादव यांनी त्यांना संपूर्ण प्रोजेक्टची माहिती सांगितली यावेळी डेरीचे संचालक अविनाश गुडेकर, मॅनेजर प्रदीप मगदूम, मार्केटिंग मॅनेजर तानाजी निंबाळकर, अकाउंट मॅनेजर विजय वाजे, सामाजिक कार्यकर्ते रमण डांगे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल पवार आदी मान्यवर आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाशीचे दुग्ध प्रकल्प पाहून थक्क झालो आणि भारावलो : अवधूत गुप्ते
वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाला भेट दिल्यानंतर गायक अवधूत गुप्ते यांनी सांगितले की, एका कोकणी माणसाने अत्यंत कल्पकतेने आणि मेहनतीने उभा केलेला वाशिष्टी डेअरीचा हा प्रकल्प पाहून आपण थक्क झालो आणि भारावून गेलो, कोकणी माणूस काही करीत नाही असे नेहमी नकारात्मक बोलले जाते मात्र कोकणी माणसाच्या बाबतीत अशी आरोळी ठोकणाऱ्यांनी आवर्जून चिपळूणत यावे आणि हा प्रकल्प मुद्दामहून पहावा. खरोखरच प्रशांत यादव व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. दुग्धजन्य पदार्थांची इतकी अप्रतिम गुणवत्ता कौतुकास्पद आहे. या गुणवत्तेमुळेच वाशिष्ठीची सारी उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. मी नॅचरल फ्लेवरचा आईस्क्रीम टाकला, खरंच चव खूप अप्रतिम आहे. त्यामुळे उत्तम दर्जाचे दूध, दही, ताक, लस्सी,पेढे आणि इतर सारी प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल तर वाशिष्ठीची एखादी शॉपी दिसली की आवर्जून या वस्तूंची खरेदी करा असा सल्ला त्यांनी ग्राहकांना दिला आणि वाशीच्या टीमचे कौतुक केले.
परमपूज्य नीति अरिहंतसिद्ध सुरीजी संप्रदायाचे परमपूज्य गणित दुपानरत्न विजयीजी आणि परमपूज्य मुनिराज ज्ञानकलश विजयजी यांनी कृषि महोत्सवाला भेट देऊन पाहणी केली. त्यांचे प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी यथोचित स्वागत करून शुभ आशीर्वाद घेतले.
बैलगाडा शर्यतीचा राजा मथुरेचे जंगी स्वागत
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील सर्वात प्रभावी बैलांपैकी एक म्हणून नावाजलेला त्याचप्रमाणे भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी अशा मानाच्या स्पर्धा जिंकणारा बैलगाडा शर्यतीचा राजा मथुर याचे शुक्रवारी दुपारी अडीच वाजता वाजत गाजत कृषी महोत्सवात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालक अमोल टाकळे यांनी मथुर येणार असल्याचे घोषित करताच शेकडो शाळकरी आणि महाविद्यालयीन मुला-मुलींनी मथूरच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती मथुरची कृषी नगरीत मोठी दमदार आणि रुबाबदार एन्ट्री झाली. मोठ्या ऐटीत चालत तो खास प्लॅटफॉर्मवर दाखल झाला. त्या ठिकाणी वाशीच्या प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव व त्यांच्या कन्या डॉक्टर स्वामिनी यांनी मथुरचे गळ्यात पुष्प मळा घालून स्वागत केले. कल्याणच्या अडवली गावातील राहुल भाई पाटील यांच्या मालकीचा बैल एकल बैल शर्यतीचा राजा म्हणून ओळखला जातो.




