Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षक नेते जमालुद्दीन बंदरकर यांचा गौरव

चिपळूण

चिपळूण :  ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवणारे, शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ ठरलेले माजी मुख्याध्यापक व शिक्षक नेते जमालुद्दीन युसूफ बंदरकर यांना अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या भव्य राज्यस्तरीय मेळाव्यात संघाचे संस्थापक व राष्ट्रीय सरचिटणीस साजिद निसार अहमद यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे बंदरकर यांच्या प्रदीर्घ व समर्पित शैक्षणिक प्रवासाला आणखी एक अभिमानास्पद मुकुटमणी लाभला आहे. यापूर्वी रोट्रॅक्ट क्लब चिपळूण तर्फे, नक्शे कोकण मुंबईतर्फे, वजीर टाइम्स व हसन मुश्रीफ फाउंडेशन कोल्हापूर तर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीतर्फे ‘समाज रत्न पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत
श्री बंदरकर यांनी तब्बल ३७ वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून आणि २ वर्षे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहून ज्ञानदानाची अखंड साधना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर , इंजिनियर, वकील अशा विविध क्षेत्रांत उच्च पदांवर विराजमान असून त्यांच्या यशामध्ये बंदरकर यांच्या कर्तृत्वाची ठळक छाप दिसून येते
केवल शिक्षक म्हणून नव्हे तर शिक्षक संघटनेत नेतृत्व करून  शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत न्याय मिळवून देण्याचे महत्त्वाचे कामही त्यांनी केले आहे. त्यांच्या या सर्वांगीण योगदानाचा सन्मान म्हणूनच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने त्यांना या पुरस्काराने गौरविले आहे.
श्री बंदरकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असून उत्कृष्ट शिक्षक, काझी,उर्दू व मराठी कवी, नाटककार, पत्रकार, अभिनय कलाकार आणि संगीतकार म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत ६० हून अधिक पदांवर उल्लेखनीय कार्य करत त्यांनी समाज जीवनात आपला ठसा उमटवला आहे.या मानाच्या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव अधिक उजळून निघाला असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!