Uncategorized

संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानच्या अध्यक्षपदी ॲड. जीवन रेळेकर यांची बिनविरोध निवड

उद्योजक राजूशेठ जोशी आणि विश्वस्त मंडळींनी केले अभिनंदन

चिपळूण :  ओंकार रेळेकर

संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानच्या विश्वस्त समितीच्या अध्यक्षपदी ॲड. जीवन काशिनाथ रेळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मा. जिल्हा न्यायाधीश, रत्नागिरी यांच्या ६ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार नव्या विश्वस्त समितीची नेमणूक करण्यात आली होती.या समितीत ॲड. संजेश मधुसूदन देसाई, अभय नारायण सहस्रबुद्धे, डॉ. प्रशांत दत्तात्रय पटवर्धन, धनंजय सुधाकर चितळे, प्रशांत निशिकांत जोशी आणि संदीप सदाशिव थत्ते यांचा समावेश आहे.दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विश्वस्तांमधून ॲड. जीवन रेळेकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व विश्वस्त तसेच देवस्थानच्या कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

फोटो : संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानच्या अध्यक्षपदी ॲड.जीवन रेळेकर यांची निवड झाल्याबद्दल
अभिनंदन करतांना राजू जोशी आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!