भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांची खेर्डीतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाला भेट
श्री दुर्गामातेचे दर्शन घेत भाविकांना दिल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

चिपळूण (ओंकार रेळेकर) : मफतलाल कॉलनी, खेर्डी येथे जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाला भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री दुर्गामातेचे मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, मंडळाच्या वतीने प्रशांत यादव यांचे स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मंडळाने केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उत्तेकर, चिपळूण मंडळ अध्यक्ष विनोद भुरण, खेर्डी जिल्हा परिषद सदस्या रावी मोरे, नैब हॉस्पिटलचे अध्यक्ष निलेश भुरण, तालुका उपाध्यक्ष वृंदा दाते, माजी सरपंच बाबू शिर्के, संतोष उतेकर, अभिनव भुरण, अनिल लांजेकर, सुहास साळुंखे, अनिल फाळके, सुनील मेस्त्री, प्रकाश पाठरूड, उमेश खातते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचा सत्कार करताना बाबू शिर्के आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया: ओंकार रेळेकर)




