Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

कुंभारखाणी खुर्द ग्रामस्थांचा समाजासमोर नवा आदर्श १५ ऑगस्ट निमित्त गावातील खड्डे बुजवत राबविली स्वच्छता मोहीम

नऊ वाड्यांतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

चिपळूण (ओंकार रेळेकर) संगमेश्वर तालुक्यातील धामापूर-कुंभारखाणी खुर्द येथील नऊ वाड्यांमधील ग्रामस्थांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी, दि.१५ ऑगस्ट रोजी एकत्र येत गावाच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले.

‘गाव आपले, जबाबदारीही आपली’ या भावनेतून ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह स्वच्छता मोहीम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.गावातील भराडीन देवी,वाघजाई देवी मंदिरात दर्शन घेऊन उपक्रमाला सुरुवात झाली. कुंभारखाणी खुर्द पंचक्रोशीतील गावणवाडी,भोजनेवाडी,मानेवाडी,गडगेवाडी,हळद वाडी,खडकेवाडी,चाफेवाडी, भेंलेवाडी,बौद्धवाडी येथील रस्त्यालगत असणारी गवत,झाडे,झुडपं आणि वाहनांना अडथळे होणारी झाडं तोडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली गावात अनेक वेळा वीज खंडित होणे प्रकार वाढले होते यावर उपाययोजना म्हणून स्वच्छता मोहिमेच्या दरम्यान गावागावातील विद्युत पोलावर जमा झालेल्या वेली झाडांच्या फांद्या या देखील तोडून विजेचे खांब स्वच्छ करण्यात आले. याचबरोबर येथे येथील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे जेसीबीच्या सहाय्याने खडी माती टाकून भरवण्यात आले या संपूर्ण सामाजिक उपक्रमामध्ये जेसीबी, ट्रॅक्टर,रोलर,गॅस कटर, ग्रास कटिंग या मशनरीचा वापर करण्यात आला ग्रामस्थ मंडळी देखील एकोप्याने गावच्या सामाजिक कार्यात आनंदाने सहभागी झाली होते.स्वच्छता मोहिमांमध्ये अनेक टन कचरा देखील गोळा करण्यात आला. याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावण्यात आली.गावात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, वयोवृद्ध माणसांना दूरवर उपचारासाठी न्यावे लागत आहे गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, रस्ते खराब असल्यामुळे खाजगी वाहने देखील येथे येत नाहीत विजेची समस्या देखील गंभीर आहे या सर्वावर उपाययोजना होण्यासाठी आम्ही ग्रामस्थ हातात हात घालून काम करणार असून पुढील काळात ग्रामस्थांच्या मदतीने कुंभारखानी खुर्द पंचक्रोशी मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुमित मिरगल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम आणि शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता त्यातून गावाच्या विकासासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. त्यानुसार गावातील विविध वाड्यांमधील नागरिक एकत्र आले. गावातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत, साचलेला कचरा तसेच अस्वच्छ परिसराची पाहणी करून प्रत्यक्ष श्रमदानातून स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली.गावातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होण्यासोबतच गावातील नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.या स्वच्छता मोहिमेत कुंभारखाणी खुर्द गावातील नऊही वाड्यांमधील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विविध स्तरांतील नागरिकांनी श्रमदान केले. स्वच्छता करताना कचऱ्याचे संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या दुतर्फा असलेला परिसर तसेच नागरिकांच्या दैनंदिन वर्दळीच्या ठिकाणी विशेष स्वच्छता करण्यात आली.गावचा विकास हा केवळ ग्रामपंचायत किंवा शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी स्वीकारल्यास गावाचा कायापालट होऊ शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशासाठी योगदान देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाच्या विकासाला हातभार लावला.या उपक्रमामुळे गावातील एकजूटही अधोरेखित झाली. विविध वाड्यांतील नागरिकांनी एकत्र येऊन केलेल्या श्रमदानामुळे गावातील सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक बळकट झाली. भविष्यातही गावाच्या स्वच्छतेसाठी,पर्यावरण संवर्धनासाठी आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभक्तीची भावना कृतीत उतरवत गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कुंभारखाणी खुर्द ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत असून, ‘शासन करेल’ या अपेक्षेपेक्षा ‘आपणच आपल्या गावासाठी काहीतरी करू’ हा संदेश ग्रामस्थांकडून या उपक्रमातून समाजासमोर आला आहे.गणेश चाचे,मनोज भोजने,श्रीकृष्णा ग्रामस्थ मित्र मंडळ गावणवाडी,नयन भोजने,रवींद्र भोजने,सुभाष भोजने,अजय भालेकर,विजय मोरे,रामदास भोजने, कृष्णा टोपरे,महेश माने,राजेंद्र महाडीक,मेघाताई भोजने
​गंगाबाई कांबळे यांनी या ‘ग्रामविकास व स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त आर्थिक सहकार्य केले.कुंभारखानी खुर्द मधील नऊ वाड्यातील ग्रामस्थांनी ग्रामविकास व स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.जेसीबीचा खर्च उद्योजक मनोज भोजने यांनी केला तर झाडांची रोपे नरेश भोजने यांनी दिली ​मेडिकल किट रोहित करंजकर यांनी उपलब्ध केली.गवत कापण्याच्या मशीनचे सहकार्य रवींद्र महाडीक, दीपक माने, दिनेश माने,रामदास भालेकर, गणेश टोपरे,संतोष गमरे,पांढुरंग भोजने शंकर वरेकर, हर्षब गमरे यांनी केले.नाष्टा,
जेवण,चहा व इतर व्यवस्था संतोष भोजने,विजय भोजने, संदेश भालेकर,सचिन भोजने,सचिन सिताराम भोजने,
​ नितीन भोजने, प्रमोद भोजने,वसंत भोजने,दिनेश माने,
​ गणेश टोपरे,रोहित करंजकर,प्रमोद माने यांनी केली.कुंभारखाणी खुर्द बौद्धजन विकास मंडळ बौद्धवाडी यांसकडून उपस्थित लोकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!