Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

मांडकी येथे १३,१४,१५ फेब्रुवारी रोजी कृषि आणि सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन

लेखक,साहित्यिक,सहकार कृषी क्षेत्रातील दिग्गज मान्यवर राहणार उपस्थित

संमेलनाचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी संमेलनाविषयी दिली विस्तृत माहिती

चिपळूण (ओंकार रेळेकर)
चिपळूण तालुक्यातील मांडकी पालवण येथे १३,१४,१५ फेब्रुवारी रोजी कृषि आणि सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून लेखक,साहित्यिक,सहकार कृषी क्षेत्रातील दिग्गज मान्यवर यात संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. याविषयी संमेलनाचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी पत्रकारांशी बोलताना संमेलनाविषयी सोमवारी विस्तृत माहिती दिली. हे संमेलन भव्य आणि दिव्य होण्यासाठी आयोजकांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन दिनांक १३,१४,१५ फेब्रुवारी रोजी होणार पहिल्या दिवशी १३ फेब्रुवारी रोजी ध्वजारोहण होईल नंतर दुपारी ग्रंथ दिंडी निघेल मग ग्रंथ प्रकाशन प्रदर्शनाच्या उद्घाटन होईल आणि संध्याकाळी कवी कट्टा रत्नागिरी जिल्ह्यातील कवींच्या साठी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी म्हणजे १४ तारखेला एक ग्रामीण साहित्यातील कोकण एक सागर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक परिसंवाद आपण आयोजित केलाय ते झाल्यानंतर ग्रामीण साहित्य काल आणि आज आणि उद्या त्याचे डॉ. राजेंद्र गवस म्हणून अत्यंत प्रसिद्ध लेखक आहेत ग्रामीण साहित्यातील ते त्याचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण कथाकथन होणार आहे अत्यंत चांगला कार्यक्रम त्याचे अध्यक्ष आहेत आप्पासाहेब खोत सहकार साहित्य व सहकार्यातून समृद्धी या सहकारातील विषयाचे तज्ञ यांचाही सत्र होणार आहे त्याचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड नंतर संध्याकाळी कवी संमेलन होणार आहे.त्याचे अध्यक्ष संजय चौधरी अशा रीतीने त्या दिवशी आपण कोकणातील वैशिष्ट्य म्हणून रात्रीचा करमणुकीचा कार्यक्रम म्हणून एक नमन होणार आहे.१५ फेब्रुवारी रोजी कृषी साहित्य आणि शेती सुधारणा या चर्चासत्रामध्ये डॉ. बाळासाहेब जनदने, शेखर गायकवाड,कालिदास भुजबळ यांच्यासारखे लोक त्या चर्चेत भाग घेणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची मुलाखत माजी संपादक यमाजी मार्कर हे घेणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय महाराष्ट्रातला म्हणजे आत्महत्या शेतकऱ्यांच्या या विषयावर आता आत्महत्या थांबूया या विषयाचा परिसंवाद त्याचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार त्यामध्ये भाग घेणार आहेत डॉ.शरद गडाख पाशा पटेल,जालिंदर पाटील, राजेंद्र कुंभार,जयदेव बर्वे, ज यू भटकर आणि लातूरचे विद्यानंद सागर महाराज या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण इंगवले करणार आहेत.तसेच येथे प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐंकता येणार आहेत. त्यामध्ये उसामध्ये संजय माने आहे त्या कडधान्यांमध्ये जयकुमार गुंडे डेअरीच्या व्यवसायामध्ये योगेश खराडे आपल्या राज्याचे फणसाची ज्यांनी लागवड केली ते हरिश्चंद्र देसाई आणि कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये कशी वापरावे हे सांगण्यासाठी डॉ.अंकुश चोरमुळे येणार आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीत अनेक साहित्य घेणार आहेत आणि आपल्याला चर्चासत्राचा विचारांचा चांगलाच सर्वांना आस्वाद घेता येईल मार्गदर्शन मिळत जाईल तेव्हा आपण सर्वांनी दिवशी हजर राहावे असे आवाहन संमेलनाचे अध्यक्ष कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी केले आहे.
फोटो : संमेलनाविषयी पत्रकारांना माहिती देताना ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!