Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

दिवा नगरीत रंगणार कलगी-तुऱ्याचा महासंग्राम; ९ ऑगस्ट रोजी नामवंत शाहिरांची शब्दांची जुगलबंदी

दिवा :

दिवा नगरीत रंगणार कलगी-तुऱ्याचा महासंग्राम; ९ ऑगस्ट रोजी नामवंत शाहिरांची शब्दांची जुगलबंदी

दिवा : लक्ष्मण जाधव यांजकडून

नवतरुण मित्र मंडळ, दिवा यांच्या वतीने रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता जिव्हाळा हॉल, दिवा-शीळ रोड येथे पारंपरिक लोककलेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. कलगी-तुऱ्याचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांची शब्दांची जुगलबंदी रंगणार असून रसिकांसाठी हा एक अविस्मरणीय सांस्कृतिक मेळावा ठरणार आहे.
या महासंग्रामात कोकणरत्न पुरस्कारप्राप्त कलगीवाले शाहीर संदीप वा. मोरे (खेड) हे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदालाल घराणे (शाखा – दिवाडकर नृत्यकला पथक, रोहिणीगाव, म्हसळा, रायगड) यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्यासमोर तुरेवाले शाहीर सचिन धुमक (ढाकमोळी, ता. चिपळूण) हे मूळ गादी बाबू रंगेले घराणे, शीघ्रकवी वासुवाणी निर्मित शाखा – श्री नटेश्वर नृत्यकला संच, मुंबई यांच्यावतीने आपली कला सादर करणार आहेत.
“शब्दा-शब्दांची जुगलबंदी, शब्दा-शब्दांची हाणामारी” अशी रंगतदार लढत अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून हाऊसफुल्लपूर्वी मोजकीच तिकिटे शिल्लक असल्याने इच्छुकांनी तातडीने आपले आसन निश्चित करावे, असेही आयोजकांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
लक्ष्मण जाधव – ९८३३०१३१९२
अक्षय कदम – ८३६९८६७६९९
सिद्धेश उतेकर – ७४९८००७८०१
कमलाकर पानवलकर – ८९२८३२५०७२
दिगंबर शितप – ८९२८५७६४०५
गणेश एकावडे – ९७०२२२३०१३
सुदर्शन जाधव – ९१६७८२१२७६
प्रितम शिंदे – ७२०८९४८०२५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!