Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव रमले बालविद्यार्थ्यांमध्ये; मित्रत्वाच्या नात्याने साधला संवाद

"गणवेश हा केवळ विद्यार्थ्यांचा पोशाख नसून समानता, शिस्त, आत्मविश्वास आणि शिक्षणातील समतेचे प्रतीक : प्रशांत यादव

 

चिपळूण (ओंकार रेळेकर)”गणवेश हा केवळ विद्यार्थ्यांचा पोशाख नसून समानता,शिस्त, आत्मविश्वास आणि शिक्षणातील समतेचे प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त झाडगाव येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रमात प्रशांत यादव यांनी बालविद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्या सोबत खाली बसून मनमोकळा संवाद साधला काहीक्षणासाठी ते स्वतः विद्यार्थी बनले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त झाडगाव रत्नागिरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वाटप कार्यक्रम भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच संपन्न झाला.या उपक्रमात भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळत त्यांच्यातीलच एक मित्र म्हणून मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या या सहज आणि आपुलकीच्या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना प्रशांत यादव यांनी सांगितले की,”गणवेश हा केवळ विद्यार्थ्यांचा पोशाख नसून समानता, शिस्त,आत्मविश्वास आणि शिक्षणातील समतेचे प्रतीक आहे.आर्थिक परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे आणि कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात बाळगू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. शिक्षणाच्या प्रवासात कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे मागे राहू नये, हीच खरी भावना आहे.”
या कार्यक्रमास आमदार प्रमोद जठार, भाजपा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित केतकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, बावा नाचणकर, जिल्हा परिषद भाजपा गटनेते प्रमोद अधटराव, पदवीधर प्रकोष्ठ मनोज पाटणकर, नगरसेवक नितीन जाधव, बाबू सुर्वे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संकेत कदम, महिला शहराध्यक्ष भक्ती दळी, सायली बेर्डे, शोनाली आंबेरकर, प्रज्ञा टाकळे, सोनाली केसरकर, सारिका शर्मा, प्रीती शिंदे, शैलेश बेर्डे, मंदार खणकर, विजय माळवदे, मंदार भोळे, सचिन गांधी, प्रशांत घाणेकर, अजिंक्य केसरकर, गणेश सालीम, निलेश आखाडे, विक्रम जेन यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि उपस्थित नागरिकांनी स्वागत करत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा समाजोपयोगी उपक्रम असल्याची भावना व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!