खेडमध्ये ‘लायन्स वर्षा मॅरेथॉन-२०२६’ उत्साहात; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह शेकडो स्पर्धकांचा सहभाग
उद्योगपती बशीरभाई हजवानी,भाजपा नेते अँड.वैभव खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती

खेड (ओंकार रेळेकर)लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज खेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘लायन्स वर्षा मॅरेथॉन-२०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मॅरेथॉनमध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम, भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि उद्योजक बशीर हजवानी यांनी शेकडो स्पर्धकांसह सहभाग नोंदविला.
‘Run for Health’ ही संकल्पना उत्तम आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून, अशा उपक्रमांमुळे सर्व वयोगटातील नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रेरणा मिळते, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
या वर्षा मॅरेथॉनमध्ये राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


मॅरेथॉनच्या माध्यमातून सुदृढ आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी तसेच सर्व सदस्य आणि आयोजकांचे मान्यवरांनी कौतुक केले.
मुकादम लँडमार्क, खेड येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी खेड नगर परिषदेच्या नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, उद्योजक पारस जैन (शा. भुरमल ज्वेलर्स), लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी, उत्तम कांबळे, संदीप मोरे, पंकज शहा, राजेश जोयसर, मुकादम डेव्हलपर्सचे मालक शमशुद्दीन मुकादम यांच्यासह खेड शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




