Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

धामणी जि.प शाळेला आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर प्रदान

भाजपा तालुका अध्यक्ष विनोद मस्के,सरचिटणीस डॉ.अमित ताठरे यांचे प्रयत्न

चिपळूण (ओंकार रेळेकर) तालुक्यातील धामणी नं.१ येथील जिल्हा परिषद शाळेला आधुनिक शिक्षणाची जोड देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून शाळेला संगणक व प्रिंटर प्रदान करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषद मराठी शाळेत काल उत्साहात पार पडला.
 विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाशी जोडून ठेवण्यासाठी तसेच त्यांना संगणक शिक्षणाबरोबरच नव्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी तालुकाध्यक्ष विनोद मस्के व तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे यांनी शाळेतील शिक्षकांच्या मागणीनुसार आमदार डावखरे यांच्याकडे संगणकाची मागणी केली होती. या मागणीची तत्पर दखल घेत आमदार डावखरे यांनी संगणक व प्रिंटर उपलब्ध करून देत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.या कार्यक्रमावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आमदार निरंजन डावखरे यांचे मनःपूर्वक आभार मानले. नव्या साधनसामग्रीमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमास भाजपा तालुका सरचिटणीस डॉ.अमित ताठरे, रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, सरचिटणीस प्रशांत रानडे, महिला तालुकाध्यक्ष सौ.शितल दिंडे, कडवई येथील माजी उपसरपंच संतोष जाधव, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गेल्ये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. दीक्षा शिंदे, उपाध्यक्ष सौ. प्रेरणा लिंगायत, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रोशन पाष्टे, शिक्षणतज्ञ अनंत लिंगायत, शिक्षिका श्रीम. शकुंतला गायकवाड, श्रीम. किरण नरवाडे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होण्याची नवी दिशा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!