Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात रत्नागिरी दक्षिण आणि रत्नागिरी उत्तरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

रत्नागिरी (ओंकार रेळेकर) भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण आणि उत्तर) पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्ता मेळावा बुधवारी (ता. 17) भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात झाला. यावेळी माजी आमदार तथा प्रभारी योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस व आमदार निरंजन डावखरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रमोद जठार, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय नातू, माजी आमदार व ज्येष्ठ नेते सूर्यकांत दळवी, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सौ. सुप्रिया उतेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजीत गुरव, रत्नागिरी उत्तर चे जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, देवरूखच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, गुहागरच्या नगराध्यक्ष नीता मालप, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष सुनील तिवरेकर, भाजपच्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव यांच्यासह भाजपच्या सर्व मोर्चाचे अध्यक्ष, सर्व मंडलांचे अध्यक्ष व मंडळाचे प्रभारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण कोकण भाजपमय करण्याकरिता पक्षाची विचारधारा गावागावापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!