भाजपा नेते अँड.वैभव खेडेकर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले स्वागत
युवाशक्ती जागर यात्रेनिमित्त भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांचे खेडमध्ये जल्लोषात स्वागत

खेड : भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘युवाशक्ती जागर यात्रा’ कोकण विभागाच्या दौऱ्यानिमित्त भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा युथ आयकॉन सन्मा. कृष्णराज महाडीक यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी खेड नगरीत त्यांचे उत्साहपूर्ण आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले.
युवकांमध्ये संघटनात्मक बळ वाढवणे, पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे पोहोचवणे आणि युवा वर्गाला राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय करण्याच्या उद्देशाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेमुळे खेड तालुक्यातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
खेड शहरात आगमन होताच कृष्णराज महाडीक यांचे फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि भव्य असा पुष्पहार घालून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. श्री. वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी ताई वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष श्री. भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, नगरसेविका सौ. स्वप्नाली ताई राकेश चव्हाण, माजी नगरसेविका सौ. आशा ताई सनगरे, भाजपा प्रेरित रिक्षा सेल जिल्हाध्यक्ष श्री. सिकंदर बांगी, श्री. राहुल पाटणे, ओवैस चौगुले, तुषार पवार, केदार वनजू, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित होता.
या प्रसंगी युवकांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर युवा मोर्चाची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी या यात्रेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
खेडमधील या स्वागत सोहळ्यामुळे भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह निर्माण झाला असून, संपूर्ण शहरात या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे.




