Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

जि.प सदस्य प्रमोद निवळकर पं.स सदस्य गौरव पाटेकर यांच्या पुढाकारातून उमरोली जिल्हा परिषद गटात गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक संपन्न

गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून उपाययोजनांचा आढावा

जि.प सदस्य प्रमोद निवळकर पं.स सदस्य गौरव पाटेकर यांच्या पुढाकारातून उमरोली जिल्हा परिषद गटात गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक संपन्न

गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून उपाययोजनांचा आढावा

चिपळूण (ओंकार रेळेकर) उमरोली जिल्हा परिषद गटात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सर्व गावांतील वायरमन तसेच महावितरणचे सेक्शन अधिकारी श्री.मोहिते यांच्या उपस्थितीत जि.प सदस्य प्रमोद निवळकर, पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर यांच्या प्रयत्नातून काल पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली.
गणेशोत्सव काळात कोणत्याही गावात वीजपुरवठा खंडित होऊन नागरिक तसेच गणेश मंडळांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सर्व डीपी, फॉल्टी लाईन्स तसेच धोकादायक व झुकलेले वीजखांब यांची आगाऊ तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांना घासून वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी तातडीने झाडांची छाटणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले. गणेश मंडळांना आवश्यक असलेली तात्पुरती वीज जोडणी तसेच इतर आवश्यक सहकार्य वेळेत उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही गावात अचानक वीजपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्यास संबंधित वायरमनने तात्काळ घटनास्थळी पोहोचून समस्या सोडवावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
उमरोळी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि प्रकाशमय वातावरणात पार पडावा, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असून, वीजपुरवठ्याबाबत काही समस्या असल्यास ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणेशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!