“स्थानिक बचत गटांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध झाल्यास बचत गटांना प्रोत्साहन मिळेल “.-सभापती बबन मनवे
म्हसळा : उदय कळस

“स्थानिक बचत गटांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध झाल्यास बचत गटांना प्रोत्साहन मिळेल : सभापती बबन मनवे
म्हसळा (उदय कळस )पंचायत समिती म्हसळा यांच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनज्योती अभियान उमेद अंतर्गत गणेश -गौरी उत्सावाचे औचित्य साधून म्हसळा एस. टी. बस स्थानक येथे म्हसळा तालुक्यातील महिला बचत गटांनी तयार केलेले साहित्याच्या विक्रीचे स्टॉल आज दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी लावण्यात आले. या स्टॉल चे उदघाटन प्रसंगी सभापती बबन मनवे यांनी सांगितले कि स्थानिक महिला बचत गटाच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळाल्यास महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळेल त्यामुळे बचत गटांमध्ये वाढ होण्यास मदत होईल, पर्यायाने गाव, वाडी, तालुक्याचा नावलौकिक वाढण्यास निश्चितपणे मदत होईल, आणि बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.स्टॉल उदघाटन प्रसंगी तहसीलदार सचिन खाडे, जि. पं. सदस्य अनिल बसवत,उपसभापती लहुशेठ म्हात्रे, पं. स. सदस्या प्रियांका निंबरे, पं. स. सदस्या समृद्धी चाचले, गटविकासाधिकारी मंगेश साळी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दामोदर दिघीकर, कक्ष अधिकारी हेमंत माळी कृषी अधिकारी जाधव,रोहिणी पाटिल,जान्हवी गावंडे,सर्व सी. आर. पी. ताई, बचत गटातील महिला आणि मान्यवर उपस्थित होते.
फोटो -म्हसळा पंचायत समितीच्या विद्यमाने आयोजित बचत गट स्टॉलचे उदघाटन प्रसंगी सभापती बबन मनवे, सोबत तहसीलदार सचिन खाडे आणि मान्यवर (छाया -उदय कळस )




