Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
Uncategorized

भाजप कार्यकर्त्यांना कुटुंबाप्रमाणे जपणारा पक्ष;कृष्णराज महाडिक

चिपळूण

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनता पार्टीमध्ये युवा मोर्चाचे महत्व फार मोठे आहे.त्यामुळेच युवाशक्ती जागर यात्रेचा प्रारंभ करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.आता युवाशक्तीची ताकद पक्षाला द्यायची आहे.आता थांबायचे नाही.भाजप हा कार्यकर्त्यांना कुटुंबाप्रमाणे जपणारा पक्ष आहे.
पक्षाची विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्पना घरघरात पोहचवण्यासाठी युवकांनी कामाला लागा असे आवाहन युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केले.चिपळूण येथील पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाकडून युवाशक्ती जागर यात्रा सुरू असून ही यात्रा आता कोकण दौऱ्यावर आहे.चिपळूणमध्ये प्रवेश करताच शहरातील खेंड येथे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा बहादूरशेख येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला भेट देत कृष्णराज महाडिक यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.तसेच त्यानिमित्ताने चिपळूण येथे भाजप पदाधिकारी बैठक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व खेळाडूंचा सत्कार सोहळा शिक्षक पतपेढी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक,भाजप नेते वैभव खेडेकर,जिल्हाध्यक्ष सतीश मोरे,युवक जिल्हाध्यक्ष राहुल पवार,मंडळ अध्यक्ष विनोद भुरण,शहर अध्यक्ष शशिकांत मोदी,युवा शहराध्यक्ष शुभम पिसे,तसेच सर्व नगरसेवक,नगरसेविका,जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील युवा मोर्चा बांधणीचा आढावा घेऊन सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात भाजप युवामोर्चा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राहुल पवार म्हणाले.जिल्हाध्यक्ष सतीश मोरे म्हणाले कृष्णराज महाडिक यांच्या दौऱ्यामुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली आहे.आम्ही सर्व पदाधिकारी युवा कार्यकर्त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असून आगामी निवडणुकांमध्ये ही ताकद दिसून येईल असे सतीश मोरे म्हणाले.
मी पेहलवानपुत्र पण……,
कृष्णराज महाडिक म्हणाले प्रत्यक्षात आमचे रक्त हे पेहलवान चे,आम्ही देखील त्या क्षेत्रात पुढे जावे अशी कुटुंबाची इच्छा होती.परंतु मला ते जमले नाही.मात्र मी क्रीडाक्षेत्रात पुढे गेलो आणि देशासाठी सुवर्णपदक पटकावले,त्यामुळे मला खेळाचे महत्व माहीत आहे.क्षेत्र कोणतेही असो पण खेळणे आवश्यक असून तरुणांनी आवड असलेल्या खेळात पुढे जावे,त्यासाठी आमच्याकडून कोणती मदत हवी असल्यास बिनधास्त आमच्याकडे या श्यक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करू असे ठाम आश्वासन कृष्णराज महाडिक यांनी नोवोदित खेळाडूंना व तरुणांना दिले.
तुमच्या प्रेमात पडलो
कोकणात आलो आणि कोकणचे निसर्गसौंदर्य पाहिल्यानंतर मी कोकणच्या प्रेमात पडलो.पण चिपळूणला आल्यानंतर मी तुमच्या प्रेमात पडलो.तुमचा उत्साह,जोश,तुम्ही केलेले स्वागत पाहिल्यानंतर येथे भाजप युवा मोर्चा मजबूत असल्याची खात्री पटली.युवा जिल्हाध्यक्ष राहुल पवार उत्तम काम करत असून त्यांनी काही संकल्पना माझ्याकडे मांडल्या व मला ते आवडल्या देखील,त्यांच्याकडे जिद्द,चिकाटी आणि मेहनत घेण्याची तयारी आहे.त्यामुळे जिल्ह्यात युवा मोर्चा ताकदीने पुढे जात असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. पण इतक्यावरच थांबून चालणार नाही.पुढे झेप घ्यायची आहे.असेही ते म्हणाले.
आता थांबायचे नाही
युवक प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक म्हणाले,कोकणाला भाजपचा बालेकिल्ला बनवायचा आहे.आणि मी प्रशांत यादव यांचे मनापासून अभिनंदन करतो,कौतुक करतो आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करतो,त्यांनी प्रचंड धाडस करत येथे वाशिष्ठी दूध प्रकल्प उभा केला आणि यशस्वी करून दाखवला आहे,कोकणात असा प्रकल्प उभा करणे येद्योगबल्याचे काम नव्हे,आणि हे सर्व करताना त्यांनी पक्षाची ताकद दुपटीने वाढवली आहे.यादव कुटुंब दिवसरात्र पक्षासाठी मेहनत घेत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो असेही ते म्हणाले.
चौकट—-
मुस्लिम तरुणांचा भाजप प्रवेश
यावेळी कालुस्ते ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून निवडून आलेले दाऊद अनवर जबले यांचा सत्कार कृष्णराज महाडिक यांच्याहस्ते करण्यात आला,लगेचच त्यांच्या बरोबर कालुस्ते येथील असंख्य मुस्लिम तरुणांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतले,मुस्लिम तरुणांनी भाजपमध्ये केलेला हा सर्वात मोठा पक्षप्रवेश होता,त्यांच्या बरोबर अन्य तरुणांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!