Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

चिपळूणातील महामार्गाच्या ब्रिजची माती बंदिस्त न केल्यास पावसाळ्यात अपघात घडण्याची शक्यता : शशिकांत मोदी

चिपळूण :

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई – गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरु
असून तहा हाईटस ते चिपळूण पंचायत समिती समोर ब्रिजसाठी उभारलेला भराव हा पूर्ण बंदिस्त न
केल्यास पावसाळ्यामध्ये माती रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच बौद्धवाडी
कडून एस. टी. बसस्थानकाकडे येणाऱ्या नागरिकांना ही याचा त्रास होणार आहे. तरी महामार्गाच्या
ठेकेदारांनी अपघात घडण्यापूर्वीच योग्य ती खबरदारी घेऊन ३१ मे २०२६ पूर्वी ही प्रलंबित कामे
पूर्ण करावीत असे आवाहन भारतीय जनता पार्टी शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले
आहे.
चिपळूण शहरात बहादूरशेख नाका ते पंचायत समिती चिपळूण या दरम्याने मुंबई- गोवा
महामार्गाच्या ब्रिजचे काम सुरु आहे या ब्रिजच्या कामासाठी टाकलेला भराव हा बंदिस्त करावा
तसेच साईड पट्ट्या व्यवस्थित भरून घ्याव्यात अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. ब्रिजच्या
खाली रस्ता आणि भराव याच्यामध्ये खड्डे निर्माण झाले असून ते भरून साईड पट्टी रस्त्याच्या समपातळी करावी असे ही शशिकांत मोदी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. चिपळूण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही सुस्थितीत ठेवाव्यात असे ही त्या निवेदनात शेवटी म्हटले
आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकारी चिपळूण, उपकार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग चिपळूण
व मुख्याधिकारी चिपळूण नगरपरिषद यांना देण्यात येणार आहे तरी ही ३१ मे २०२६ पूर्वी कामे व्हावीत असे ही त्या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!