राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पार्टीच्या चिपळूण महिला तालुकाध्यक्ष पदी शिरगाव गावची सुकन्या राखी विनय आडवीलकर हिची निवड
राखी विनय आडवीलकर सामाजिक क्षेत्रात देखील आहेत अग्रेसर

चिपळूण (ओंकार रेळेकर)राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पार्टीच्या चिपळूण महिला तालुकाध्यक्ष पदी शिरगाव गावची सुकन्या राखी विनय आडवीलकर यांची पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांनी निवड जाहीर केली त्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले
शिरगाव मधील अरुता उर्फ राखी अडविलकर हिला लहानपणापासून समाजसेवेची आवड होती शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने फोटोग्राफी व्यवसाय करू लागली त्यातच महिलांचे प्रश्न सोडवू लागली त्यातच तिचे पती विनय अडविलकर यांनी मोलाची साथ दिली त्यातच तिच्या सामाजिक कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांनी घेतली आणि तिचा राजकणात प्रवेश करून घेतला तर चिपळूण महिला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी तिच्यावर सोपवली त्याबाबत निवड नुकतीच घोषित करण्यात आली तिच्या निवडीबाबत अनेकांनी तिचे अभिनंदन केलें.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने , अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महेश सावंत,सेवा दल जिल्हाध्यक्ष याकुब खान, ओबीसी जिल्हाध्यक्ष वासू आप्पा सुतार,जिल्हा उपाध्यक्ष अशपाक तांबे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पवार, तालुका अध्यक्ष राजेश केळकर, युवक कार्याध्यक्ष अक्षय केदारी, नियाज सनगे,
जिल्हा सरचिटणीस नसीम सय्यद,जिल्हा सचिव मिनल बांदेकर, जिल्हा सदस्य सोनिया लोहिया, उपशहरध्यक्षा दिपा कोलतेकर, नगरसेविका नसरिन खडस, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




