नगरसेविका वैशालीताई निमकर यांच्या पुढाकाराने अमेय पार्क समोरील रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात
चिपळूण :

चिपळूण ओंकार रेळेकर)मुरादपूर, अमेय पार्क येथील रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत शिवसेना-भाजप महायुतीतील भाजपच्या कार्यतत्पर नगरसेविका सौ. वैशाली मधुकर निमकर यांनी परिषदेत सातत्याने पाठपुरावा करून रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुरादपूर येथील अमेय पार्क परिसरातील रस्त्याची पाहणी केली. यावेळी संबंधित जागामालकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
रस्त्याच्या कायमस्वरूपी उपाययोजनेपर्यंत नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेविका वैशाली निमकर आणि नगरसेवक गोताड यांनी मुंबई-गोवा पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांशी चर्चा करून मोठ्या सिमेंट ब्लॉक्सची उपलब्धता करून देण्याचे प्रयत्न केले.
ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार नगरसेविका वैशाली निमकर यांनी या कामाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. या कामासाठी भारतीय जनता पार्टीचे गटनेते शशिकांत मोदी यांचे विशेष सहकार्य लाभले.




