Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

वीर-देवपाठ रस्त्याचे काम आमदार भास्करराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी; फुकटचे श्रेय घेऊ नये – तालुकाप्रमुख सुभाष जाधव

चिपळूण :

 

चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील वीर–देवपाठ रस्त्याचे काम आमदार भास्करराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागले असून, या कामाचे फुकटचे श्रेय कोणीही घेऊ नये, असा इशारा शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख सुभाष जाधव यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सुभाष जाधव यांनी सांगितले की, वीर–देवपाठ रस्त्याची अनेक वर्षांपासून मोठी दुरवस्था झाली होती. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना वाहतुकीसह दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी आमदार भास्करराव जाधव यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.
ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेत आमदार भास्करराव जाधव यांनी या रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने हाताळला. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यासाठी अर्थसंकल्पातून तब्बल २.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, असे त्यांनी नमूद केले.
सुभाष जाधव म्हणाले की, वीर–देवपाठ रस्ताच नव्हे, तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी आमदार भास्करराव जाधव यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे वीर–देवपाठ रस्त्याच्या कामाचे संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते. या कामाचे श्रेय घेण्याचा इतरांनी प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!