Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

जागतिक योग दिनानिमित्त चिपळूणमध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन

भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या संकल्पनेतून उपक्रम; नागरिकांना सहभागाचे आवाहन

 

चिपळूण (ओंकार रेळेकर)आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिपळूण येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.उद्योजक भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे योग शिबिर रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ९८९००२८०७८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून १७ जून २०२६ पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
“योग हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली; योग दिनाचा संकल्प करू, आरोग्यदायी जीवन घडवू!” या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास चिपळूण व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!