राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या चिपळूण महिला तालुकाध्यक्ष पदी अरुता आडवीलकर यांची निवड
प्रदेश निरीक्षक विजय देसाई यांनी दिले नियुक्तीपत्र

चिपळूण (ओंकार रेळेकर) केवळ सरकार कडून महिला बचत गटांना कर्ज दिले म्हणजे महिलांचा विकास होत नाही तर महिलांच्या वैयक्तिक उत्पादन वाढीवर भर दिला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत महिला बचत गटांसाठी विशेष प्रयत्न करणार असून त्या माध्यमातून महिलांच्या संघटन वाढीवर भर दिला जाणार आहे असे प्रतिपादन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिपळूण नवनिर्वाचित तालुका महिला अध्यक्ष अरुता आडविलकर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या चिपळूण महिला तालुकाध्यक्ष पदी शिरगाव गावची सुकन्या अरुता आडवीलकर यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश निरीक्षक विजय देसाई रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले असता पक्षाच्या कार्यक्रमात त्यांनी अरूता आडविलकर यांना नियुक्तीचे पत्र दिले.
पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांनी त्यांची निवड काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती त्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले शिरगाव मधील अरुता अडविलकर यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी फोटोग्राफी व्यवसाय करू केला त्यातच महिलांचे प्रश्न सोडवू लागल्या त्यातच त्यांचे पती विनय अडविलकर यांनी मोलाची साथ दिली त्यांच्या सामाजिक कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांनी घेतली आणि त्यांचा राजकणात प्रवेश करून घेतला तर चिपळूण महिला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्याबाबत निवड नुकतीच घोषित करण्यात आली या निवडीबाबत अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलें आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश निरीक्षक विजय देसाई, महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता तांबे, प्रवक्ते महेश चव्हाण,जिल्हाध्यक्ष सुरेश बने,सतीश खेडेकर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अलवी,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महेश सावंत,सेवा दल जिल्हाध्यक्ष याकुब खान,जिल्हा उपाध्यक्ष अशपाक तांबे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पवार, कार्याध्यक्ष शिरीष काटकर,तालुका अध्यक्ष राजेश केळकर,युवक कार्याध्यक्ष अक्षय केदारी,नियाज सनगे,
जिल्हा सरचिटणीस नसीम सय्यद,जिल्हा सचिव मिनल बांदेकर,जिल्हा सदस्य सोनिया लोहिया,उपशहरध्यक्षा दिपा कोलतेकर,महेंद्र कदम यासीन खान मुन्ना जसनाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश निरीक्षक विजय देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व सन्मान स्वीकारताना अरुता आडविलकर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




