Welcome to Pavan News 2611
Click to listen highlighted text!
Welcome to Pavan News 2611
- चिपळूण (ओंकार रेळेकर)पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या बद्दल अर्वाच्या शब्दात व्यक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी चिपळूण भाजप शहर मंडळ यांच्या वतीने आज चिपळूण पोलीस स्थानकात सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले आहे .या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की नरेंद्र जी मोदी साहेब यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद घोषणा देऊन चुकीच्या पद्धतीने त्या व्यक्त करून त्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अयान मिठागरी याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.त्याने अशीच धार्मिक तेढ यापूर्वी निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी केला असल्याची माहिती ही शिष्टमंडळाने पोलिसांना दिली. आयन मिठागरी याच्यावर पुढील आठ दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास किंवा त्याला योग्य ते शासन न झाल्यास भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही त्या निवेदनात शेवटी नमूद करण्यात आलेले आहे.हे निवेदन भारतीय जनता पार्टी शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांच्या उपस्थितीत नगरसेविका रसिका देवळेकर, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, सरचिटणीस सारिका भावे , रुई खेडेकर जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उत्तेकर, नगरसेविका शितल रानडे, जिल्हा सहचिटणीस आनंद रानडे, नरेंद्र बेलवलकर, कुणाल आंबेकर, पूनम काजारी ,राकेश दाते, सौ टाकळे ,अभिषेक राजापूरकर पूजा कदम, प्रणय वाडकर विलास चव्हाण, प्रबोधन पिंपटकर आणि नगरसेविका अंजली कदम, विनायक भैरवकर सभापती शुभम पिसे, जतीनघटे ,आनंद टाकळे ,अक्षय ओतारी ,अनुजा ओतारी अमोल तटकरे ,रोहन जडे, महेश विंचू ,सोहन शिंदे, दिनेश लटके, निखिल किल्लेकर आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टी चा विजय असो, नरेंद्र मोदी साहेब आगे बढो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!