Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

अखिल मराठा फेडरेशन च्या उपाध्यक्ष पदी रमेशराव शिर्के यांची निवड

चिवेली ता. चिपळूण

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ या संस्थेचे प्रमुख कार्यवाह व मराठा मंडळ मुलुंड चे अध्यक्ष श्री. रमेशराव र.शिर्के यांची अखिल मराठा फेडरेशन च्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.
श्री. रमेशराव शिर्के हे गेली अनेक वर्षे चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ या संस्थेचे अध्यक्ष व विद्यमान प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. तसेच मराठा मंडळ मुलुंड या संस्थेचे गेली अनेक वर्षे अध्यक्ष आहेत. त्यांनी या दोन्हीही संस्थांच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.तालुक्यातील चिवेली येथील आदर्श विद्यामंदिर या विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून देण्यासाठी मोठे योगदान दिले.
या निवडीबद्दल त्यांचे चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे अध्यक्ष राजेश शिर्के,उपाध्यक्ष नरेंद्र वणे, विजय शिर्के,कार्यवाह रविंद्र शिर्के,विक्रम कानसे, संतोष गोरीवले,कोषाध्यक्ष मंगेश शिर्के,सल्लागार रघुनाथ शिर्के, अशोक वनगे,दिनेश शिर्के,कृष्णा पडवळ,अनंत सुर्वे,शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, स्कुल कमिटी चेअरमन संतोष कुळे, मुख्याध्यापक संजय चव्हाण यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!