Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांकडून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिपळूणात जल्लोषात स्वागत

चिपळूण :

चिपळूण (ओंकार रेळेकर)राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार (ता. १) पासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, रायगड जिल्ह्यातील दौरा आटोपल्यानंतर ते मोटारीने रत्नागिरीकडे रवाना झाले. दरम्यान, चिपळूण येथील पाग परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपच्या चिपळूण ग्रामीण व शहर मंडलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत केले.
महसूलमंत्री बावनकुळे यांच्या स्वागतावेळी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले तसेच मोठ्या उत्साहात त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, सरचिटणीस सौ. सुप्रिया उतेकर, चिटणीस अनिल सावर्डेकर, चिटणीस योगेश शिर्के, उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तसेच भाजपच्या जिल्हा निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, नगरसेवक शुभम पिसे, नगरसेविका शीतल रानडे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, जिल्हा परिषद सदस्य रावी मोरे यांच्यासह माजी नगरसेवक विजय चितळे, ॲड. नयना पवार, अभय चितळे, बाळा दाते, राकेश दाते, अनवर जबले, रमण डांगे, अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, अनिल चिले, रुपेश आवले, सुनील वाजे तसेच भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.महसूलमंत्री बावनकुळे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या भेटीदरम्यान स्थानिक संघटनात्मक कामकाज, विविध विकासकामे आणि आगामी कार्यक्रमांबाबतही पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.


फोटो : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव,सौ.स्वप्नाताई यादव,अँड.नयना पवार ,शशिकांत मोदी छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!