Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

वाचनालय म्हणजे तरुण पिढीच्या भविष्याचा राजमार्ग : डॉ तानाजी चोरगे

चिपळूण खेंड येथे विभा अरविंद ग्रंथालयाचे थाटात उद्घाटन

.

चिपळूण शहरातील खेंड स्प्रिंग हॉस्पिटल येथे विभा अरविंद वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन नगरसेवक अंकुश आवले आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. चोरगे बोलत होते.

कार्यक्रमात पुढे बोलताना डॉ. चोरगे म्हणाले की, कितीही वाचनालय सुरू केली तरी ती कमीच पडणार आहेत. प्रत्येक घराघरात वाचनाची आवड लागणे गरजेचे आहे. वाचन हे मेंदूचे अन्न आहे. त्याने आपले मस्तक सुधारते. नवीन पिढीचे आयुष्य सुसंस्कृत होण्यासाठी वाचनालयाची भूमिका महत्वाची आहे. पूर्वी वाचनालयाची संख्या जास्त होती. मात्र, आता जशा शाळा बंद होत आहेत. तशीच वाचनालय सुद्धा बंद होताना दिसतात. मोबाईलच्या युगात वाचन हरवले आहे.आताची पिढी घडवण्यासाठी जुन्या लोकांनी काय केले हे समजून घेताना त्यांची चरित्र वाचली पाहिजे.यावेळी त्यांनी आताच्या शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा ताशेरे ओढले. आताची गुणवत्ता म्हणजे गुणांची खैरात आहे, त्यांनी सांगितले. यावेळी आ. शेखर निकम ,माजी आमदार रमेश कदम, नगर सेवक अंकुश आवले, साहित्यिक अरुण इंगवले, साहित्यिक राष्ट्रपाल सावंत आदींनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश देशमुख, नगरसेवक अंकुश आवळे, नगरसेविका नीलिमा जाधव, नगरसेविका राणी महाडिक, माजी आ. रमेशभाई कदम, लोस्टिमा कार्याध्यक्ष अरुण इंगवले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत,विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश काणे, नगरसेवक अजय भालेकर, नगरसेवक निहार कोवळे , प्रसाद प्रशांत डमढेरे, प्रसाद रिसबूड, डॉ. यतीन जाधव, डॉ. वैशाली जाधव, संतोष देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.विभा अरविंद ग्रंथालय उद्घाटन झाल्यानंतर सर्वांनी डॉ. यतीन जाधव आणि परिवाराचे कौतुक केले. त्यांनी वाचनालयासाठी जागा देत आर्थिक योगदान सुद्धा दिले आहे. त्यामुळे हे वाचणालय निश्चितच आप्पांच्या कार्याचे प्रतीक असणार आहे. विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश काणे यांनी वाचनालयाची निर्मिती कशी झाली याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जोशी आणि आभार प्रदर्शन विजय कदम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!