महाराष्ट्र
आ. भास्करराव जाधव यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने स्वप्ना यादव सन्मानित
सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार; मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव

चिपळूण (ओंकार रेळेकर) : इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने गौरव करण्यात आला. शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला आमदार शेखर निकम, भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उद्योजक राजू जोशी, अभिजीत हेगशेट्ये, संस्थेचे अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे होते.
शाहू महाराजांचे कार्य प्रत्येकासाठी आदर्श
पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्वप्ना यादव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, शाहू महाराजांचे कार्य हे प्रत्येकासाठी आदर्शवत आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात आपले वडील सुभाष चव्हाण यांनी केली. गेल्या ३३ वर्षांत संस्थेने मोठी आर्थिक प्रगती साधली असून, आज संस्थेची उलाढाल सुमारे २२०० कोटी रुपये झाली आहे. तसेच एक हजार कोटी रुपयांचा कर्जव्यवहार झाल्याची माहिती त्यांनी दिली.
याशिवाय वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आज सुमारे १५ ते २० हजार शेतकऱ्यांना सहाय्य मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रामदास आठवले यांनी शाहू-आंबेडकरांच्या संबंधांचा उल्लेख केला
कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळच्या संबंधांचा उल्लेख केला. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर एससी-एसटी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला, असे त्यांनी सांगितले.ज्यांचे उत्पन्न कमी आहे, अशा गरजू घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही आपली भूमिका असल्याचे सांगतानाच, “मात्र, अन्य कोणत्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये,” असेही आठवले यांनी स्पष्ट केले. चिपळूणवर आपले प्रेम असल्यानेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.स्वप्ना यादव यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो : सौ. स्वप्ना यादव यांना सन्मानित करताना आ. भास्करराव जाधव यांच्यासह भाजपा नेते प्रशांत यादव व मान्यवर.(छाया : ओंकार रेळेकर)