सतीश कदम यांच्या ‘शब्द नव्हे शस्त्र’ पुस्तकाचा ३० ऑगस्टला प्रकाशन सोहळा
‘कोकण एक्सप्रेस’मधील दशकभरातील संपादकीयांचे पुस्तक रूप; चिपळुणात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

चिपळूण : ‘कोकण एक्सप्रेस’ या वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या निवडक संपादकीय अग्रलेखांचे संकलन करून तयार करण्यात आलेल्या ‘शब्द नव्हे शस्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी चिपळुणात आयोजित करण्यात आला आहे.
लेखक व संपादक सतीश कदम यांच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सकाळी १० वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ, वीरेश्वर कॉलनी, चिपळूण येथील हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी साहित्य, पत्रकारिता, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
‘शब्द नव्हे शस्त्र’ या पुस्तकामध्ये ‘कोकण एक्सप्रेस’मधून गेल्या दहा वर्षांत प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखांचे संकलन करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय आणि विविध समकालीन विषयांवर भाष्य करणाऱ्या या लेखनाला पुस्तकाच्या माध्यमातून कायमस्वरूपी स्वरूप देण्यात आले आहे.या प्रकाशन सोहळ्यास आमदार शेखर निकम, आमदार प्रमोद जठार, माजी आमदार सदानंद चव्हाण, शुभदा जोशी (संपादक – दैनिक सागर), ज्येष्ठ साहित्यिक तानाजीराव चोरगे, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, संस्कृती प्रकाशन पुणेच्या प्रकाशक सुनिताराजे पवार, चिपळूणच्या उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर तसेच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे अध्यक्ष यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या स्वागतासाठी सौ. अंजली कदम, नगरसेविका व अध्यक्ष, नगर बाल संरक्षण समिती; ऋतुजा कदम, अँकर, एबीपी माझा मराठी; तसेच गार्गी कदम, कंटेंट रायटर व डॉक्युमेंटरी स्क्रिप्टर यांची उपस्थिती राहणार आहे.या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमी, पत्रकार, वाचक, सामाजिक कार्यकर्ते आणि चिपळूणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक व संपादक सतीश कदम यांनी केले आहे.कार्यक्रमाचे ठिकाण : ब्राह्मण सहाय्यक संघ, वीरेश्वर कॉलनी, चिपळूण
दिनांक : रविवार, ३० ऑगस्ट २०२६ वेळ : सकाळी १० वाजता
पुस्तक : ‘शब्द नव्हे शस्त्र’
लेखक व संपादक : सतीश कदम




