Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

चिपळूण तालुका सरपंच संघटनेची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट; विविध मागण्यांचे निवेदन सादर

चिपळूण :

 

मुंबई : चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ३०) ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रालयात भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गोरे यांनी यावेळी दिले.

चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या विकासाशी संबंधित विविध विषय, स्थानिक स्वराज्य संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या समस्या मांडत त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

या प्रसंगी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपचे नेते सहदेव बेटकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, भाजपचे जिल्हा चिटणीस, चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, भाजप चिपळूण ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा भिलेच्या सरपंच सौ. आदिती गुडेकर, संघटनेचे उपाध्यक्ष सुहास भागडे, सचिव विकास गमरे, सहसचिव सदानंद पवार, सदस्य श्रेया वीरकर, नम्रता मोहिते, सल्लागार संदीप जाबरे, सल्लागार तथा मालघरचे सरपंच सुनील वाजे यांच्यासह चिपळूण तालुक्यातील अनेक सरपंच उपस्थित होते.

सरपंच संघटनेच्या या शिष्टमंडळाच्या भेटीमुळे चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायतींचे विविध प्रश्न शासन स्तरावर मांडले गेल्याने त्यांच्या सोडवणुकीला गती मिळेल, अशी अपेक्षा उपस्थित सरपंचांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!