Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

जनतेच्या सेवेसाठी जि.प सदस्य ॲड.महेंद्र मांडवकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा दिमाखात शुभारंभ

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे पं.स. सदस्य नेताजी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले उद्घाटन

रत्नागिरीत जावकर प्लाझा येथे कार्यालय सुरू; शेकडो कार्यकर्ते,मित्र परिवाराची उपस्थिती

नागरिकांना मिळणार विविध शासकीय कामांसाठी मोफत सेवा

रत्नागिरी : (ओंकार रेळेकर)रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परिसरातील जावकर प्लाझा येथे रत्नागिरी-पावस जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रच्या रत्नागिरी विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड.महेंद्र मांडवकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.

या सोहळ्यास शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी,मित्रपरिवार व नागरिकांची उपस्थिती लाभली.
पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना तातडीच्या कामानिमित्त चाकण येथे जावे लागल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे तसेच पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सचिव केदार चव्हाण, रत्नागिरी तालुकाध्यक्ष मंदार नैकर, लांजा तालुकाध्यक्ष योगेश पांचाळ, सचिन गोताड, साहिल गोरे, दीपक सांबरे, बंटी महाकाळ, कैलास आडवीरकर, राज फुटक, मंदार मांडवकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास उर्फ बंधू वारीशे, पावस जिल्हा परिषद गट उपविभाग प्रमुख प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेवजी कोकरे, पावस विभाग समन्वयक अजय तेंडुलकर, निलेश गजने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शुभचिंतक उपस्थित होते.जनतेच्या प्रश्नांसाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी ॲड. महेंद्र मांडवकर यांना जनसेवेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आणि अडचणी सोडविण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्यात येईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. “जनतेच्या प्रश्नांसाठी ॲड. महेंद्र मांडवकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू,” असे आश्वासनही उपस्थित मान्यवरांनी दिले.
नागरिकांसाठी विविध सेवा पूर्णपणे मोफत या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरणे, जात, उत्पन्न, रहिवासी व नॉन-क्रिमिलेअर दाखल्यांसाठी अर्ज करणे, संबंधित अर्जांचा पाठपुरावा करणे, तसेच जिजाऊ संस्थेच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सर्व सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.खेड्यापाड्यातून विविध शासकीय कामांसाठी शहरात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य सहज उपलब्ध व्हावे, हा जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे ॲड. महेंद्र मांडवकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!