Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी मिरजोळी येथे चहा-नाश्ता वाटप

शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

चिपळूण (ओंकार रेळेकर) : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चिपळूण तालुक्यातील मिरजोळी दलवाई पंप येथे चहा-नाश्त्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी सकाळी शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
मुंबईसह विविध शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होत आहेत. लांबचा प्रवास करून येणाऱ्या गणेशभक्तांना प्रवासादरम्यान काही काळ विश्रांती घेत चहा व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या उपक्रमाचे आयोजन केले आहे. प्रवाशांकडूनही या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!