Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
Uncategorized

माजी आमदार सदानंद चव्हाण दक्षिण मध्य मुंबई साठी प्रभारीना.एकनाथ शिंदे यांनी सोपविली दोन प्रभागाची जबाबदारी

चिपळूण (ओंकार रेळेकर)- राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन प्रभागासाठी प्रभारी म्हणून शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. धारावीतील प्रभाग क्र.१८७ आणि १८८ या दोन प्रभागांसाठी पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी देत सदानंद चव्हाण यांच्यावर विश्वास टाकला आहे.
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. राज्यातील शिवसेना भाजप महायुतीसह शिवसेना (उबाठा) मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची महविकास आघाडी निवडणूक रिंगणात आहे. तर काँग्रेस या ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. प्रचाराच्या याच धामधुमीत एकनाथ शिंदे यांनी उपनेते आणि चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना प्रभाग क्र.१८७ व १८८ या दोन प्रभागाचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. याविभागात उबाठाचे अनिल देसाई हे खासदार आहेत तर काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या आमदार आहेत. या प्रभागातील नुकत्याच झालेल्या चिपळूण नगर परिषद निवडणुकीत सदानंद चव्हाण यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली तब्बल १६ जागा जिंकत युतीचा भगवा फडकवला आहे. चव्हाण यांच्या याच नेतृत्वाची दखल घेत ना.एकनाथ शिंदे यांनी उपनेते सदानंद चव्हाण यांच्या खांद्यावर अत्यंत विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी समाविष्ट असलेल्या धारावी मतदारसंघात सदानंद चव्हाण शिवसेनेला नक्की यश मिळवून देतील असा विश्वास चिपळूण मधील शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!