महाराष्ट्र
चिपळूण ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुखपदी सुभाष जाधव

चिपळूण (ओंकार रेळेकर)तालुक्यातील गुहागर
मतदारसंघात समावेश असलेल्या ७२ गावांच्या तालुकाप्रमुखपदी ठाकरे शिवसेनेने पंचायत समितींचे
माजी उपसभापती सुभाष जाधव यांची नियुक्ती केली आहे.
मंगळवारी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकातून जाधव यांची निवड जाहीर झाली..
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीअगोदर पंचायत समितीचे माजी सभापती व ठाकरे शिवसेनेचे विद्यमान तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांची ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून रिक्त असलेल्या तालुकाप्रमुखपदी जाधव यांची निवड झाली. मुख्याध्यापक
पदावरून निवृत्त झालेले जाधव पंचायत समिती उपसभापतीही होते. आमदार भास्कर जाधव यांच्या
शिफारशीनेच सुभाष जाधव यांच्यावर नवी जबाबदारी
सोपवण्यात आली आहे.




