Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

चिपळूणमध्ये ‘जर्नालिस्ट असोसिएशन’ची स्थापना; अध्यक्षपदी सुनील साळवी यांची निवड

‘कोकण एक्सप्रेस’चे संपादक सतीश कदम यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती

चिपळूण (प्रतिनिधी)चिपळूण तालुक्यातील डिजिटल तसेच प्रिंट मीडियामध्ये कार्यरत असलेल्या श्रमिक पत्रकारांनी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी एकत्र येत ‘जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण’ या नव्या संघटनेची स्थापना केली आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा देणे तसेच सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक ‘सागर’चे ज्येष्ठ पत्रकार सुनील साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या पत्रकारितेतील दीर्घ अनुभव आणि संघटन कौशल्याचा विचार करून ही निवड करण्यात आल्याचे सदस्यांनी सांगितले. तसेच ‘कोकण एक्सप्रेस’चे संपादक सतीश कदम यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, संघटनेच्या कार्यात त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष म्हणून ‘व्हिजन थ्री न्यूज’चे संपादक राजेंद्रकुमार शिंदे व ‘जीएसके न्यूज’चे संपादक गजेंद्र खडपे यांची निवड झाली. ,सचिव म्हणून ‘दिव्य रत्नागिरी’चे संपादक योगेश बांडागळे, तर खजिनदार म्हणून ‘राजसत्ता’चे संपादक संतोष पिलके यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण रिपोर्टरचे संपादक मकरंद भागवत यांच्यासह मराठी समाचारचे संपादक दीपक शिंदे यांच्यासह ललेश कदम,पवन न्यूजचे संपादक ओंकार रेळेकर, नवराष्ट्रचे प्रतिनिधी निसार शेख यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.बुधवारी सायंकाळी चिपळूण येथे पत्रकारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली आणि नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या, आव्हाने तसेच भविष्यातील कामकाजाचा आराखडा यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी नूतन अध्यक्ष सुनील साळवी यांचा संघटनेतर्फे बुके देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी संघटनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकारांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि समाजाभिमुख कार्य करणे हे संघटनेचे प्रमुख ध्येय राहील. सर्व पत्रकारांना एकत्र घेऊन ही संघटना चिपळूणमध्ये एक सक्षम व्यासपीठ म्हणून उभी राहील.”कार्याध्यक्ष सतीश कदम यांनीही आपले विचार मांडताना संघटनेच्या बळकटीसाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. उपस्थित इतर पदाधिकारी व सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि संघटनेच्या यशस्वीd वाटचालीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.एकूणच, ‘जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण’ या संघटनेच्या स्थापनेमुळे तालुक्यातील पत्रकारांना एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध झाले असून, भविष्यात पत्रकारांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारी ही संघटना ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!