श्री संध्या लायन्स रिजन कॉन्फरन्स आज डि स्टार वॉटर पार्क मधे संपन्न होणार
इंटरनॅशनल डायरेक्टर एम जे एफ लायन राजभाई मुच्छाल चिपळूण मध्ये

चिपळूण (ओंकार रेळेकर)लायन्स प्रांत ३२३४ ड १ विभाग ५ ची विभागीय परिषद डी स्टार वॉटर पार्क अँड रिसॉर्ट पेढांबे चिपळूण येथे आज सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे. सदर विभागीय परिषदेसाठी मल्टिपल 3234 चे इंटरनॅशनल डायरेक्टर पी एम जे एफ लायन राजभाई मुछाल उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या विभागीय परिषदेसाठी दापोली ते मालवण असे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्यातील एकूण वीस लायन्स क्लब चे सदस्य व चार लिओ क्लबचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. प्रांत ३२३४ ड १ मधील रिजन ५ कोकण विभाग सदस्य संखेमधे प्रांतामधे अग्रस्थानी आहे. या विभागीय परिषदेचे प्रमुख एम जे एफ दिलीप कुमार जैन, कॉन्फरन्स चेअरमन लायन अमर शेट्ये, रिजन सेक्रेटरी लायन मिलिंद मुद्राळे आणि त्यांची टीम ही विभागीय परिषद यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. रिजन मधील सेवा कार्यांचा आढावा, आगळ्यावेगळ्या सर्विस ऍक्टिव्हिटी चे आदानप्रदान, उत्तम कामगिरी करणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गुणगौरव सोहळा, क्विझ कॉन्टेस्ट, बैनर प्रेझेंटेशन, बेस्ट सिग्नेचर काँपीटीशन सह विवीध मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रिजनमध्ये समाजातील गरजवंतांची गरज ओळखून सेवा कार्यामध्ये कशाप्रकारे बदल करता येईल याबाबत तसेच प्रभावी नेतृत्व कसे असावे यावर लायन राजभाई मुच्छाल सर्व लायन सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम जे एफ लायन डॉ विरेंद्र चिखले, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर १ एम जे एफ लायन राजेंद्रभाई शहा (कासवा), व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २ एम जे एफ लायन डॉ.किरण खोराटे, लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिओ भाविन जैन, माजी प्रांतपाल एम जे एफ लायन उदयजी लोध व माजी प्रांतपाल पी एम जे एफ लायन जगदीश पुरोहित यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चिपळूण मधिल प्रतिष्ठित कापड व्यापारी व जयंत साडी सेंटरचे मालक मनमिळावू , शांत व सुस्वभावी व्यक्तिमत्व एमजेएफ लायन दिलीप कुमार जैन हे रिजनचे प्रमुख असल्याने रिजन मधील सर्व क्लबमधून बहूसंख्य सदस्य या रिजन कॉन्फरन्स ला उपस्थित राहणार आहेत.
लायन्स क्लब चिपळूण या होम क्लबचे सर्व सदस्य या श्री संध्या रिजन कॉन्फरन्स च्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न करत आहेत. कोकण रिजन ५ मधिल जास्तीत जास्त लायन्स, लिओ सदस्यांनी या कॉन्फरन्स ला हजर रहावे असे आवाहन कॉन्फरन्स चेअरमन लायन अमर शेट्ये व लायन्स क्लब चिपळूण अध्यक्ष लायन शिरीष मुळे यांनी केले आहे.




