वैभव खेडेकर मित्र परिवार तर्फे शनिवार दि १४ मार्च रोजी ‘ईप्तार पार्टी ‘ चे आयोजन
इफ्तार पार्टीतून होणार हिंदू मुस्लिम एकोफ्याचे दर्शन

चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी नगराध्यक्ष अँड. श्री वैभवजी खेडेकर मित्र परिवार तर्फे रमजान सणा निमित्त शनिवार दि. १४ मार्च – २०२६ रोजी साय. ६.० वा. हॉटेल चंदी हवेली भरणे नाका मुस्लिम बांधवांकरिता’ ईप्तार पार्टी , चे आयोजन करण्यात आले आहे.
रमजानच्या पवित्र सणामुळे सध्या मुस्लिम बांधवांचे सर्वञ उपवास सुरू आहेत. संपूर्ण समाजात आंनदाचे व उत्साहाचे वातावरण सुरू आहे.’त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची सामाजिक बांधिलकी जपण्या करिता.सालाबादप्रमाणे यावर्षी देखील वैभवजी खेडेकर मित्रपरिवार यांच्यातर्फे ‘ईप्तार पार्टी’ चे आयोजन केले आहे.
आजपर्यंत खेड मध्ये सर्व धर्मियांच्या सणांमध्ये वैभवजी खेडेकर अग्रक्रमाने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपत सर्व सणाचा, व नागरिकांचा उत्साह द्विगुणित करित आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या ‘ईप्तार पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या ‘ईप्तार पार्टी’ मध्ये बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अँड. वैभव खेडेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.




