Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

विराट हिंदू संमेलनाचे आज श्रीवर्धनमध्ये आयोजन

श्रीवर्धन

श्रीवर्धन (ओमकार महादेव रेळेकर) श्रीवर्धन येथे ‘विराट हिंदू संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले असून, सकल हिंदू समाजाच्या एकतेचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “धर्मो रक्षति रक्षितः” या संदेशाखाली होणाऱ्या या संमेलनाबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे संमेलन आज सोमवार, दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता श्री सोमजादेवी मंदिराच्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून, हिंदू समाजाच्या एकजुटीवर विशेष भर दिला जाणार आहे.संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. श्रीवर्धन परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!