सदानंद चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी तालुका कार्यकारिणीत शिवसैनिकांचा ठराव

चिपळूण (ओंकार रेळेकर)कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.इथली जागा ही पारंपरिक शिवसेनेची आहे त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा हक्क आहे.हे लक्षात घेऊन इथली उमेदवारी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या रूपाने चिपळूण तालुक्याला मिळावी अशी मागणी चिपळूण तालुक्यातील शिवसैनिकांनी केली आहे.आज झालेल्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव एकमताने संमत करण्यात आला.विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून १ जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.राज्यात महायुती सत्तेत असल्याने रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्हयाच्या मतदारसंघाची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.या मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी शिवसेना प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे साहजिकच या जागेवर शिवसेनेचा दावा निश्चित मानला जात आहे.शिवसेनेकडून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधीत्व केलेल्या सदानंद चव्हाण यांना संधी मिळावी अशी येथील कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे.ना.एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी चिपळूण येथील जाहीर सभेत लवकरच सदानंद चव्हाण यांना मोठी जबाबदारी दिली जाईल असा शब्द दिला होता.त्यामुळे ही संधी सदानंद चव्हाण यांच्या रूपाने चिपळूण तालुक्याला मिळावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे.आज दुपारी तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या कडे भूमिका मांडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे मुख्य नेते उप मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी करण्यात यावी असे निश्चित करण्यात आले.या बैठकीला तालुकाप्रमुख तथा उपसभापती संदेश बापू आयरे,तालुकाप्रमुख रुपेश घाग,शहरप्रमुख तथा नगराध्यक्ष उमेश सकपाळ,जिल्हा परिषदेचे माजी सभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य विनोद झगडे,माजी जि.प.सदस्य बाळशेठ जाधव,नगर परिषद सभापती कपिल शिर्के,निहार कोवळे,पंचायत समितीचे माजी गटनेते राकेश शिंदे,नगरपरिषद गटनेते अंकुश आवले, नगर परिषद सभापती हर्षाली पवार,उपसभापती राणी महाडिक,नगरसेवक उदय जुवळे,प्रमोद बुरटे,विकी लवेकर,गणेश आग्रे,नगरसेविका नीलम जाधव,माजी नगरसेवक परिमल भोसले,उप शहरप्रमुख सुयोग चव्हाण,दयानंद जुवळे, महिला आघाडीच्या शहर प्रमुख प्राजक्ता टकले, युवासेनेचे संपर्कप्रमुख अवधूत शिर्के,युवासेना शहर प्रमुख विनोद पिल्ले, उप तालुकाप्रमुख सिद्धार्थ कदम, विभागप्रमुख दीपक वारोसे अमित खातू,फैसल मेमन,यांच्यासह शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.



