एनडीटीव्ही मराठी न्यूज अँकर ऋतुजा कदम हिचा शहर मंडल भाजपातर्फे सत्कार
भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित मान्यवर सत्कार सोहळा संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर) महाराष्ट्रातील लोकप्रिय
एनडीटीव्ही मराठी मधे न्यूज अँकरिंग करीत म्हणून नेमणूक असलेल्या चिपळूणची कन्या ऋतुजा सतीश कदम हिचा भाजपा शहर मंडल यांच्या वतीने आयोजित मान्यवर,चेअरमन,संचालक मंडळींच्या सत्कार सोहळ्यात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सीईओ सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री व खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मान्यवर,चेअरमन,संचालक यांच्या सत्कार कार्यक्रमाचे शहर मंडलच्या वतीने शहरातील ब्राह्मण सहायक संघ येथे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.आपल्या लोकांकडून जेव्हा सत्कार होतो तेव्हा खूप आनंद वाटते आणि एक गोष्ट लक्षात येते की आपण नक्कीच चांगले काम करतोय आणि पुढील काळात अजून जोमाने काम केले पाहिजे अशी ऊर्जा मिळते मी मनापासून भारतीय जनता पार्टीचे आभार मानते असे ऋतुजा कदम हिने सत्काराला संबोधित करतांना सांगितले.ऋतुजा कदम हिने रुईया कॉलेज मुंबई येथे बॅचलर इन मास मीडिया आणि एमआयटी कॉलेज पुणे येथे मास्टर इन जर्नालिझम शिक्षण पूर्ण करून पुढील काळात एबीपी माझा,साम टीव्ही मध्ये काम केले आहे.सध्या ती एनडीटीव्ही मराठी मधे न्यूज अँकरिंग करीत आहे.चिपळूण मधील जेष्ठ पत्रकार सतीश कदम,नगरसेविका अंजली कदम यांची ती कन्या आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव,चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण,सीईओ सौ.स्वप्ना यादव,नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे,उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर,स्मिताताई चव्हाण,भाजपा शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी,परशुराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक मकरंद जोशी, नॅबचे अध्यक्ष श्री.नीलेश भुरण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण,सीइओ सौ.स्वप्ना यादव, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे,यांच्यासह अनेक मान्यवरांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले.सत्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी भाजपा सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पालकर, निखिल किल्लेकर यांनी केले.तर अभय चितळे यांनी आभार मानले.
फोटो : एनडीटीव्ही न्यूज अँकर ऋतुजा सतीश कदम हिचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करतांना चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सीईओ सौ.स्वप्ना यादव आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




