Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

अनिर्णीत गिरणी कामगार प्रश्न सोडवणुकीला प्राधान्य दिले जाईल! कामगारारनेते गोविंदराव मोहिते यांची ग्वाही

मुंबई :

.

त्यापूर्वी खंडाळा येथे पार पडलेल्या प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते गोविंदराव मोहिते यांचा गुणगौरव करण्यात आला.
गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर १६ गिरणी कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीच्या वतीने जो यशस्वी लढा उभा करण्यात आला आहे,त्याच्या पाठपुराव्यात गोविंदराव मोहिते यांनी घेतलेले परिश्रम तसेच बंद एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली जी आंदोलने छेडण्यात आली,त्यामध्येही गोविंदराव मोहिते यांचे कार्य विशेष लक्षणीय ठरले आहे, असे याप्रसंगी अनेक नेत्यांनी सांगितले.खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघूनाथ (अण्णा) शिर्सेकर, बजरंग चव्हाण,सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे,आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी.बी.गावडे, संघटन सेक्रेटरी सुरेश मोरे आदींची त्यावेळी भाषणे झाली.***

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!