Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

भाजपा चिपळूण शहर मंडलच्या वतीने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित चिपळुणात २२ जुलै रोजी रक्त दान शिबिराचे आयोजन

चिपळूण :

चिपळूण (ओंकार रेळेकर )महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असून त्यानिमित्ताने चिपळूण शहर मंडल तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे रक्तदान शिबिर अपरांत हॉस्पिटल भोगाळे चिपळूण येथे पार पडणार असून रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रक्ताचा असणारा तुटवडा भरून काढण्यासाठी भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम घेण्यात आलेला आहे. यासाठी महिला मोर्चा अध्यक्ष रसिका देवळेकर युवा मोर्चा अध्यक्ष शुभम पिसे व या रक्तदान शिबिराचे संयोजक संदीप भिसे व सह संयोजक संगीता पालकर हे विशेष मेहनत घेत आहेत. तरी रक्तदात्यांनी आपली नावे त्वरित नोंदवून सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!