प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कडवई विभागातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोथरे यांच्यासह अनेक प्रमुख ग्रामस्थांचा समावेश

कडवई विभागातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षेला न्याय देणार : प्रशांत यादव
संगमेश्वर (पवन न्यूज) भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कडवई येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर बोथरे यांच्यासह कडवई विभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. कडवई बाजारपेठ येथील सभागृहात शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आपण सर्वांनी भाजपवर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थकी लागेल. कडवई विभागातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षांना न्याय मिळेल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी यावेळी प्रवेशकर्त्यांना आश्वस्त केले.
यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, पंचायत समितीचे सदस्य महेश उर्फ बावा जड्यार, भाजपचे संगमेश्वर उत्तर ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, संगमेश्वर उत्तर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शितल दिंडे, गोरक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अविनाश गुरव, संगमेश्वर उत्तरचे सरचिटणीस प्रशांत रानडे, सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, अन्वरभाई जबले व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रशांत यादव म्हणाले, आपण आज भारतीय जनता पक्षाच्या विचारपरिवारात प्रवेश करीन विकास, राष्ट्रहीत आणि जनसेवेचा मार्ग स्वीकारला आहे. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि ग्रामस्थाचा सन्मान, विश्वास आणि सहभाग जपण्याची जबाबदारी आमची आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण खांद्याला खांदा लावून काम करू आणि आपल्या प्रत्येक अपेक्षेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. यावेळी कडवई विभागाच्या वतीने प्रशांत यादव आणि इतर मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी कडवई येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर बोथरे यांच्यासह, जितेंद्र वारोसे, गजानन ओकटे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अनिस खान, सादिक खान, फिरदोस सय्यद, युवराज गंगाराम तुळसणकर, शरद सखाराम सावरटकर, अनंत महादेव तुळसणकर, चंद्रकांत महादेव तुळसणकर, उमेश विष्णू मांडवकर, दत्ताराम तुकाराम तुळसणकर, विठ्ठल बाबूराव पवार, निलेश सुरेश तुळसणकर, सागर अनंत तुळसणकर, सोहम राजेंद्र सावरटकर, अभिषेक उमेश मांडवकर, लक्ष्मण रंगनाथ दंडगुले, योगिता युवराज तुळसणकर, शिल्पा शरद सावरटकर, शुभांगी अनंत तुळसणकर, दिया जितेंद्र सावरटकर, सुलभा उमेश मांडवकर, सुजाता सुरेश तुळसणकर, विजय काशिनाथ कुंभार, संतोष काशिनाथ कुंभार, सचिन काशिनाथ कुंभार, विद्या विजय कुंभार, सोनाली संतोष कुंभार, सानिका सचिन कुंभार, रुपाली विठ्ठल पवार, सुभाष कुंभार, विलास सुवरे, अजगर फणसोपकर, विनायक गुरव, महेंद्र कदम, तुषार कदम, विलास ओकटे, राजेश मांडवकर, विनोद मांडवकर, शुभम कुंभार, साहील पवार, प्रज्वल पवार, ज्ञानेश्वर पवार, हनुमंत दंडगुले आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




